शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या परवानगीअभावी अंडरब्रीज अधांतरी

By admin | Updated: November 16, 2015 03:11 IST

प्रवाशांना सुविधा देण्यासाठी असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

प्रवाशांची गैरसोय : गेट बंद करण्याची परवानगी मागणार ‘एनएचएआय’नागपूर : प्रवाशांना सुविधा देण्यासाठी असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानकापूर रेल्वे अंडरब्रीजचे झपाट्याने सुरू असलेले काम बंद पडले आहे. रेल्वेकडून युटिलिटी शिफ्टिंग किंवा आवश्यक सामुग्री पुलाखाली टाकण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया(एनएचएआय)ला रेल्वेकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मानकापूरमध्ये रेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. त्यामुळे साईनगर, ओमनगर, झिंगाबाई टाकळीजवळील नागरिकांना लांब फेरा मारावा लागत होता. रेल्वे गेट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मानकापूर रेल्वे गेटला भेट देऊन अधिकाऱ्यांना गेट सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या; सोबतच एनएचएआयला रेल्वे अंडरब्रीज तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर लवकरच रेल्वे अंडरब्रीजचे काम सुरू झाले. २३ कोटी रुपये खर्चून ४० मीटर लांब रेल्वे अंडरब्रीज तयार करण्यात येत आहे. परंतु उशीर होत असल्यामुळे या कामाचा खर्च वाढून नागरिकांनाही त्रास होणार आहे. रेल्वे अंडरब्रीजखाली एनएचएआयला केबल टाकावयाचे आहे. याशिवाय नाल्याचे खोदकाम करावयाचे आहे. या कामासाठी एनएचएआयने रेल्वे गेट बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. (प्रतिनिधी)चिंचभुवन रेल्वे ओव्हरब्रीजची फाईल मुंबईत अडकलीकेंद्र शासनाशी निगडित उपक्रम असूनही रेल्वे आणि एनएचएआयमध्ये समन्वयाचा अभाव आहे. डिझाईनला मंजुरी मिळण्यासाठी फाईल एक वर्ष फिरत राहते. चिंचभुवनमध्ये प्रस्तावित नवा रेल्वे ओव्हरब्रीज त्याचे एक उदाहरण आहे. एमएसआरडीसीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या रामझुल्याच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेने कामात बराच वेळ खोळंबा घातला होता. चिंचभुवन आरओबीची फाईल सध्या पुन्हा रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात पडून आहे. ‘डीआरएम’ला पत्र दिलेमानकापूर रेल्वे अंडरब्रीजचे काम झपाट्याने सुरू होते. युटिलिटी शिफ्टिंगसाठी रेल्वेला परवानगी मागितली, ती मिळाली नाही. याबाबत डीआरएमला पत्र देण्यात आले आहे. रेल्वे लाईनच्या खालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम करावयाचे आहे. रेल्वे गेटही बंद करावे लागेल.’-श्रीराम मिश्रा, प्रकल्प संचालक, एनएचएआय‘सीआरएस’ची परवानगी मिळालीमानकापूर रेल्वे अंडरब्रीजसाठी कमिश्नर आॅफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) यांची परवानगी मिळाली आहे. सध्या या कामात काय अडचण आहे, याची माहिती नाही.’-ओ.पी. सिंह, ‘डीआरएम’ मध्य रेल्वे,नागपूर विभाग