शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:15 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : पाेलिसांनी बुधवारी (दि. ३) रात्री कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये माेटरसायकल चाेरट्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : पाेलिसांनी बुधवारी (दि. ३) रात्री कन्हान (ता. पारशिवनी) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये माेटरसायकल चाेरट्यात शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या तीन माेटरसायकली जप्त केल्या, अशी माहिती पाेलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी दिली.

गाेलू बिहारी उंदरिया (२५, रा. टेकाडी, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चाेरीच्या घटना हळूहळू वाढायला सुरुवात झाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी गांभीर्याने चाेरट्यांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. या चाेरीत गाेलूचा सहभाग असून, ताे बुधवारी (दि. ३) रात्री ७ वाजताच्या सुमारास टेकाडी येथील साईमंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला हाेता.

दरम्यान, पाेलिसांना पाहताच गाेलूने पळ काढला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करून त्याला त्याब्यात घेतले. चाैकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. शिवाय, त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या एमएच-४०/एएन-७८८०, एमएच-४०/एएफ-८८८७ व एमएच-३१/ईजे-८६९६ क्रमांकाच्या तीन माेटरसायकली जप्त केल्या. या तिन्ही माेटरसायकलींची एकूण किंमत १ लाख २० हजार रुपये असून, त्याने यातील दाेन माेटरसायकली कन्हान व एक माेटरसायकल नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरल्याची माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. त्याच्याकडून वाहन चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, येशू जोसेफ, राहुल रंगारी, शरद गीते, सुधीर चव्हाण, मंगेश सोनटक्के, वीरेंद्रसिंग चौधरी, विशाल शंभरकर, जितेंद गावंडे यांच्या पथकाने केली.