लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव वेगाने ट्रॅव्हल चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक चौकात घडली. नावेद हसन अन्सारी (३५) रा. प्लॉट नं. १४१४, आसीनगर, टेका हे एम. एच. ४९, ए. एच-५८२६ क्रमांकाच्या दुचाकीने अशोक चौक, झेब्रा क्रॉसिंगजवळून जात होते. तेवढ्यात ट्रॅव्हल बस क्रमांक एम. एच. ३१, डी. एस-१२१४ चा आरोपी चालक विनोद सुरेश कोंडविलकर याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून अन्सारी यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कोतवाली पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
नागपुरात ट्रॅव्हल्सच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:54 IST
भरधाव वेगाने ट्रॅव्हल चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक चौकात घडली.
नागपुरात ट्रॅव्हल्सच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठळक मुद्देअशोक चौकातील घटना