शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

नागपूरच्या मेडिकलमध्ये स्क्रब टायफसचे पुन्हा दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 20:42 IST

‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. यातील २५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात सध्या पाच रुग्ण असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमृताची संख्या ९ : ११ नव्या रुग्णांची भर : रुग्णांची संख्या ३७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. यातील २५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. मेडिकलच्या अतिदक्षता विभागात सध्या पाच रुग्ण असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.शंकर पराते (५५) रा. छिंदवाडा व सुगंधा नन्ने (५०) असे मृताचे नाव आहे.विदर्भासह बाजूच्या मध्य प्रदेशात स्क्रब टायफसचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. रोज नवे रुग्ण दिसून येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘स्क्रब टायफस’वरील उपाययोजनांना घेऊन दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राची (एनआयसीडी) चमू गुरुवारपासून नागपुरात तळ ठोकून आहे. प्रत्येक बाबी तपासून घेत आहे. परंतु हा रोग सर्वच भागात दिसून येत असल्याने तो कुठून व कसा पसरत आहे, याचा शोध घेण्यात त्यांना अडचण जात आहे. यामुळे ही चमू कीटकतज्ज्ञाची मदत घेणार असल्याची माहिती आहे.उपचार सुरू होत नाही तोच मृत्यूभंडारा येथील पवनी खैरी गावातील सुगंधा नन्ने यांना शुक्रवारी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात भरती केले, परंतु उपचार सुरू होत नाही तोच मृत्यू झाला. छिंदवाडा येथील शंकर पराते हा रुग्ण मेडिकलमध्ये बुधवारी भरती झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, हे दोन्ही रुग्ण मेडिकलमध्ये दाखल झाले तेव्हा रोगाची गुंतागुंत वाढली होती.मेडिकलमध्ये स्क्रब टायफसची चाचणी होत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मेडिकलने रुग्णाची जलद गतीने चाचणी करण्यासाठी ‘रॅपिड टेस्ट’ सुरू केली. मात्र आरोग्य विभागाच्या निकषानुसार अचूक चाचणी करण्यासाठी मेडिकलमध्ये शुक्रवारपासून ‘एलायझा’ चाचणीला सुरुवात झाली.मेडिकलमध्ये ‘एलायझा’चाचणी‘रॅपिड टेस्ट’मधून स्क्रब टायफसचे निदान योग्य होईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे, आरोग्य विभागाने मेडिकलला ‘एलायझा’ चाचणी उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी यावर ४५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने लावले असून शनिवारी त्याचा अहवाल येईल. या चाचणीतून योग्य निदान होऊन नेमके किती रुग्ण आहेत, ते स्पष्ट होईल.डॉ. मिलिंद गणवीरसहायक संचालक, (हिवताप) आरोग्य विभाग नागपूर.मृत्यूची आकडेवारीठिकाण           मृत्यू संख्याखैरी, भंडारा           १छिंदवाडा               १मोवाड नरखेड       १नरखेड                  १अकोला                 १बालाघाट               १काटोल                  १जरीपटका नागपूर १

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर