शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुलींनी एका प्रवाशाला केली बेदम मारहाण; अजनी स्थानकावर लगेज उचलून ठेवण्याचा वादावरून हाणामारी

By नरेश डोंगरे | Updated: February 24, 2026 19:17 IST

Nagpur : लगेज उचलून ठेवण्याच्या वादातून बाचाबाची झाल्यानंतर दोन कुलींनी एका प्रवाशासोबत हाणामारी करून त्याला जखमी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लगेज उचलून ठेवण्याच्या वादातून बाचाबाची झाल्यानंतर दोन कुलींनी एका प्रवाशासोबत हाणामारी करून त्याला जखमी केले. अजनी रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे फलाटावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

सोनू गायकवाड आणि अजय पाल अशी आरोपी कुलींची नावे आहेत. हे दोघेही गोधनी रोडवर राहतात. ते अजनी रेल्वे स्थानकावर कुलीचे काम करतात. पुणे अजनी हमसफर एक्सप्रेसने प्रवास करणारे एक दाम्पत्य रविवारी दुपारी १२.४० वाजता अजनी स्थानकावर उतरले. सोनू आणि अजय त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी २०० रुपयांत सामान उचलून फलाटाबाहेर नेण्याचे ठरले. मात्र, फलाट क्रमांक १ चा जिना उतरल्यानंतर सोनूने सामान बाजुला ठेवून दिल्याने संबंधित दाम्पत्याने त्याला गाडीजवळ सामान नेऊन देण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो वाढतच गेला. यानंतर आरोपी अजय पाल सोनूच्या मदतीला आला आणि त्या दोघांनी महिलेच्या पतीला मारहाण केली. खाली पडल्यामुळे पीडित व्यक्तीच्या कंबरेला जबर दुखापत झाली.

हाणामारीच्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच आरपीएफचे पथक घटनास्थळी धावले. त्यांनी पीडित आणि आरोपींना वेगळे करून त्यांना पोलिस चौकीत नेले. उपचार करून घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी या प्रकरणात पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आरोपी सोनू गायकवाड तसेच अजय पालविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

कुलींची दादागिरी नेहमीचीच

नागपूरचे मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकावर २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. फलाटांची आणि विकास कामे सुरू असल्याने प्रवाशांना सहजपणे आपले सामान ईकडून तिकडे उचलून नेणे शक्य होत नाही. त्याचा लाभ उठवत काही कुली मनमानी पद्धतीने वागतात. अव्वाच्या सव्वा पेसे मागतात. त्यांचे वर्तनही अत्यंत उर्मट असते. त्यामुळे रोज कुणा ना कुणासोबत काही कुलींचे खटके उडतात, असे सांगितले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Coolies Assault Passenger Over Luggage Dispute at Ajni Station

Web Summary : A passenger was beaten by two coolies at Ajni station following a dispute over luggage handling charges. The incident caused a commotion, leading to police intervention and the filing of assault charges against the coolies. Coolies are known for overcharging passengers.
टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर