शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोघे ठार; ११ जखमी

By admin | Updated: April 21, 2016 03:11 IST

कुवारा भिवसेन येथे यात्रेकरिता भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले.

पारशिवनी : कुवारा भिवसेन येथे यात्रेकरिता भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शीलादेवी-सुवरधरा रस्त्यावर बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.भारत गणपत वरखडे (५५, रा. बनेरा) व राजेश बलदेव आहाके (१४, रा. शीलादेवी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातातील जखमींमध्ये रंजना पंधराम (१८, रा. अंबाझरी), सुरतीया इनवाते (६०, रा. पारडी), आशा भन्नारे (१६, रा. पारडी), सोनीलाल मरकाम (२१, रा. शीलादेवी), मन्सूक मरस्कोल्हे (५५, रा. उमरानाला), ऐश्वर्या धुर्वे (७, रा. उमरानाला), लीलावती भन्नारे (४७, रा. पारडी), लीलाबाई टेकाम (४०), रामेश्वर धुर्वे (२२), सूरज धुर्वे (१२), संजू आहाके (१७) सर्व रा. शीलादेवी, या ११ जणांचा समावेश आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर सहा जणांवर पारशिवनी ग्रामीण रुग्णलयात औषधोपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)सविस्तर असे की, शीलादेवी येथील रवी सुखदेव उईके यांच्याकडील कुवारा भिवसेन येथे नवसाचा कार्यक्रम होता. यानिमित्त उईके कुटुंबीय आपल्या नातेवाईकांसह एमएच-४०/एल-४५४९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कुवारा भिवसेन येथे जात होते. दरम्यान, शीलादेवी ते सुवरधरा मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. ट्रॉली उलटल्याने ट्रॉलीतील सर्वजण दबल्या गेले. यात भारत वरखडे व राजेश आहाके या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य ११ जण जखमी झाले. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये १९ नागरिक बसले होते.यात्रेदरम्यान पहिलीच घटनाचैत्र पंचमीनिमित्त कुवारा भिवसेन येथे दरवर्षी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त अनेकजण येथे दाखल होतात. शीलादेवी येथील उईके कुटुंबीयांनी यात्रेनिमित्त घरगुती नवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र वाटेतच अपघातात दोघांचा मृत्यू ओढवल्याने शीलादेवी गावात शोककळा पसरली आहे.घटनास्थळी ग्रामपंचायतींना जोडल्या जाणाऱ्या केबल लाईनचे जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते. त्या मशीनची बकेट ट्रॉलीला लागल्याने हा अपघात झाला असावा. शिवाय, ट्रॅक्टरचालक हा दारू पिऊन होता, अशी चर्चा घटनास्थळावरील नागरिकांत दिसून आली.