Two killed and three injured in accident in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील अपघातात दोन ठार तर तीन जखमी
नागपूर जिल्ह्यातील अपघातात दोन ठार तर तीन जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: काटोल पांढुरणा रोड वर रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान झालेल्या अपघातात खापरखेडा येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन लोक गंभीर जखमी झाले आहे. खापरखेडा येथील सचिन जानराव कुसराम वय 32 यांच्या मुलीचं बारसं काटोल-पांढुरणा रोड वर पिपळा (खुर्द) या गावी होते. मुलीचं बारसं कार्यक्रम आटपवून सचिन हा त्याचा लहान भाऊ गणेश जानराव कुसराम वय 24 राहणार खापरखेडा, आणि मित्र खेकडा उर्फ दिनेश नागोराव खंडाते वय 27 राहणार खापरखेडा , धनंजय गणेश रायकुवार वय 28 राहणार चनकापूर , नातेवाईक अक्षय रमेश वाडीवे वय 26 वर्ष राहणार अमरावती हे बुलेरो चारचाकी वाहनाने पांढुरणा काटोल मार्गे खापरखेडा येथे घरी येण्यास निघाले. दरम्यान 8.30 वाजता मध्यप्रदेश हद्दीत अपघात झाला. अपघातात गणेश आणि दिनेशचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन, अक्षय , धनंजय या तिघांचाही उपचार पांढुरणा येथे सुरू आहे. गणेश आणि दिनेश हे अविवाहित असून खापरखेडा येथील वॉर्ड क्रमांक चार मध्ये एकमेकांच्या घराजवळच राहतात. या घटनेची माहिती कळताच मृतक व जखमींची मित्र मंडळी आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले. मृतकांचे प्रेत चे उत्तरीय तपासणी पांढुरणा येथे सोमवारी सकाळी करण्यात आला. त्यांचे प्रेत खापरखेडा येथे आणण्यात येत आहे. या घटनेची माहिती सोमवारी सकाळी वा?्यासारखी खापरखेडा येथे पसरली. खापरखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप सोमकुवर समवेत शेजारी मदतीसाठी धावून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: Two killed and three injured in accident in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.