शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2015 20:03 IST

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रिधोरा/नरखेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दोन विविध ठिकाणातील या घटनेत एका शेतकऱ्याने विष प्राशन केले तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटना काटोल तालुक्यातील रिधोरा येथे सोमवारी ७ वाजताच्या सुमारास तर दुसरी घटना नरखेड तालुक्यातील माणिकवाडा येथे रविवारी सकाळी उघडकीस आल्या. गजानन संतोष सेलवटकर (५५, रा. रिधोरा, ता. काटोल) आणि चंपत जंगलू पांडे (६५, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. सेलवटकर यांच्याकडे सव्वादोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी इंडियन ओव्हरसिस बँक काटोल शाखेकडून ७५ हजार रुपये आणि रिधोरा येथील एका सोसायटीचे दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या तीन वर्षापासूनच्या नापिकीमुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. त्यातच कर्जवसुलीसाठी बँक प्रशासन तगादा लावत असल्याने ते तणावात होते.दरम्यान, रविवारी सायंकाळच्या सुमारास रेशनचे धान्य आणण्याकरिता जातो म्हणून सायकल घेऊन घराबाहेर पडले. परंतु रात्र होऊनही वडील घरी आले नसल्याने मुलगा दिनेशने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गावालगतच्या कालव्याजवळ गजानन सेलवटकर यांनी आत्महत्या केल्याचे बातमी मिळाली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्जवसुलीकरिता बँकेचा तगादा व सततची नापिकीमुळे सेलवटकर हताश झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने ते मानसिक तणावात होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला. गजानन सेलवटकर हे गावात लोहारकाम करीत होते. वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या मदतीला धावूनही जात असत. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू केला आहे. आत्महत्येची दुसरी घटना माणिकवाडा येथे घडली. चंपत पांडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सात एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नातेवाईकांकडून दोन लाख ५० हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. तसेच शेतीवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० हजार रुपये कर्ज थकीत असल्याने इतर बँकांकडून कर्ज मिळाले नाही. त्यातच यंदा संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते सतत तणावात होते.दरम्यान, शनिवारी (दि.२६) रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जेवण आटोपून चंपत पांडे घराबाहेर पडले. त्यानंतर ते मध्यरात्रीपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, रविवारी सकाळी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. शासनाने दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्यावरील कर्ज माफ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.(प्रतिनिधी)