शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
4
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
5
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
6
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
7
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
8
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
9
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
10
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
11
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
12
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
13
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
14
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
15
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
16
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
17
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
18
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
19
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
20
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन

By admin | Updated: January 24, 2015 02:32 IST

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यात असून हा विहार मुक्त करण्याच्या दृष्टीने भूमिका ठरविण्यासाठी लॉर्ड बुद्धा मैत्री संघ आणि वंदना संघ दीक्षाभूमीच्यावतीने ...

नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यात असून हा विहार मुक्त करण्याच्या दृष्टीने भूमिका ठरविण्यासाठी लॉर्ड बुद्धा मैत्री संघ आणि वंदना संघ दीक्षाभूमीच्यावतीने दोन दिवसांचे अखिल भारतीय भिख्खु संमेलन २५ आणि २६ जानेवारीला आसोला येथील बुद्धनगरीच्या लॉर्ड बुद्धा परिसरात करण्यात आले आहे, अशी माहिती भदंत आनंद महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भदंत आनंद महाथेरो म्हणाले, बोधगया महाबोधी महाविहार कायद्याने हिंदूंच्या ताब्यात आहे. हे महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी मागील १८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन दिवसीय भिख्खु संमेलनात घर वापसी अभियान बौद्ध धम्मासह, अल्पसंख्यांक धर्मावर परिणाम करणारे आहे यावर तसेच मोदी सरकारच्या धर्म परिवर्तन विरोधी विधानाचा धर्म स्वातंत्र्यावर होणारा परिणाम, भारतीय बौद्धांची भूमिका यावर विचारमंथन करण्यात येणार आहे.दोन दिवसीय भिख्खु संमेलनाचे उद्घाटन भिख्खु भदंत ज्ञानेश्वर कुशीनारा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भदंत आनंद महाथेरो उपस्थित राहणार आहेत. संमेलनात भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भदंत नरेंदा महाथेरो, भदंत आर्यपुत्र अंगुलीमाल महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, भदंत थेरोज्योती महाथेरो, शांतीस्वरूप बौद्ध, राजेंद्र गाणोरकर, भय्याजी खैरकर, देवीदास घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पत्रकार परिषदेला भदंत आनंद महाथेरो, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, प्रा. देवीदास घोडेस्वार, भय्याजी खैरकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)