भीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:52 PM2021-06-11T21:52:03+5:302021-06-11T21:52:36+5:30

मृत महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी

Two car wrecks, three women killed in horrific accident in nagpur | भीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू

भीषण अपघातात कारचे दोन तुकडे, तीन महिलांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहा भीषण अपघात नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.

नागपूर (केळवद) : दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि कार छोट्या पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळली. यात कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले असून, कारमधील तीन महिलांचा मृत्यू झाला तर कारचालक व एक महिला गंभीर जखमी झाली.

मृतांमधील एक महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी आहे. हा भीषण अपघातनागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला. मृतांमध्ये प्रिया सचिन जयस्वाल (३२, रा. कळमेश्वर), रोशनी अनूप जयस्वाल (३०) व माधुरी अंगद जयस्वाल (३६) दोघीही रा. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघींचा समावेश असून, संचित प्रेम जयस्वाल व नीलम संचित जयस्वाल (३२) दाेघेही रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. जयस्वाल यांच्या नातेवाईकाने रामाकाेना (मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी रात्री लग्न असल्याने हे सर्व जण लग्नात सहभागी हाेण्यासाठी गेले होते.

Web Title: Two car wrecks, three women killed in horrific accident in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app