बुटीबोरीत दोन दुचाकी आपसात भिडल्या, आई-वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:56 IST2023-04-13T10:55:55+5:302023-04-13T10:56:18+5:30

दुसऱ्या अपघातात कामगाराचाही मृत्यू

Two bikes collide in Butibori, child dies along with parents | बुटीबोरीत दोन दुचाकी आपसात भिडल्या, आई-वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू

बुटीबोरीत दोन दुचाकी आपसात भिडल्या, आई-वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, बुटीबोरी/नागपूर: बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलावर बुधवारी रात्री भीषण अपघात घडला. दोन दुचाकी आपसात भिडल्या. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या एका अपघातात एका कामगाराचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ४० सीएल - ९९१९ आणि एम.एच.-४० एएस-५८७१ या क्रमांकाच्या दोन्ही दुचाकी बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने वेणा नदीच्या पुलावरून विरुद्ध दिशेने येत होत्या. या दोन्ही बाइक आपसात धडकल्या. यात सुकळी येथे जात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात वडील शंकर बिसेन (३७), त्यांची पत्नी सरिता बिसेन (३२) आणि मुलगा हिमांशू बिसेन (१४) यांचा समावेश आहे. इतर तीन जखमींपैकी दोघांना नागपूरला तर एकाला बुटीबोरी येथील माया रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या एका अपघातात अज्ञात वाहनाने मोरारजी कंपनीच्या कामगाराला जगत हॉटेलजवळ वर्धा रोडवर उडवले. मृताचे नाव विजय सूर्यभान ढानके असे असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Two bikes collide in Butibori, child dies along with parents