शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेडनेट प्रकरणात दोघांना अटक

By admin | Updated: April 15, 2016 03:13 IST

जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्याची ‘शेडनेट व पॉलिहाऊस’च्या नावाखाली लाखो रुपयांनी लुबाडणूक करून कर्जबाजारी ...

नागपूर : जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्याची ‘शेडनेट व पॉलिहाऊस’च्या नावाखाली लाखो रुपयांनी लुबाडणूक करून कर्जबाजारी करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना गुरुवारी कुही पोलिसांनी अटक केली आहे. दिशा ग्रीन हाऊस मार्केटिंग कंपनीचे मालक पांडुरंग महाजन व कुंदन महाजन दोघेही रा. यावल जि. जळगाव अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना कुहीचे ठाणेदार प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात एका विशेष पथकाने यावल येथून अटक केली आहे. याप्रकरणी एकूण चार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९ व ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नागपुरातील बायोमिक्स कंपनीचे मालक अभिजित महाजन यांनी न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणाचा ‘लोकमत’ने सर्वप्रथम भंडाफोड करून, त्याचा सतत पाठपुरावा केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी उमरेड तालुक्यातील तितूर येथील तरुण शेतकरी मंगेश मोतीराम जपुलकर यांचे सुमारे ६८ लाख २७ हजार रुपये लंपास केले आहे. आरोपींनी मागील २०१३ मध्ये जपुलकर यांना आधुनिक शेतीचे स्वप्न दाखवून त्यांना आपल्या शेतावर ‘शेडनेट व पॉलिहाऊस’ उभारण्याचा सल्ला दिला. सोबतच त्यासाठी लागणारे बँक कर्जही उपलब्ध करून देण्याची हमी दिली आली. त्यानुसार जपुलकर यांनी ‘शेडनेट व पॉलिहाऊस’ उभारण्याचा निर्णय घेतला आणि आरोपींच्या सल्ल्यानुसार आपली संपूर्ण शेती व नागपुरातील राहते घर उमरेड येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गहाण करून सुमारे ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले. यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून जपुलकर यांना ‘शेडनेट व पॉलिहाऊस’साठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य देऊन, त्यांच्याकडील संपूर्ण ६७ लाखांची रक्कम हडप केली. दुसरीकडे ते संपूर्ण साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने जपुलकर यांच्या शेतावरील ‘शेडनेट व पॉलिहाऊस’ काहीच दिवसांत जमीनदोस्त झाले. मात्र तोपर्यंत सर्व आरोपी शेतकऱ्याचा पैसा घेऊन पसार झाले होते. तेव्हापासून जपुलकर यांनी कृषी विभागासह पोलीस, जिल्हाधिकारी व मंत्र्यांना अनेक तक्रारी दिल्या. परंतु त्याची कुठेही दखल घेण्यात आली नाही. शेवटी जपुलकर राज्याचे लोकायुक्तापर्यंत पोहोचले. लोकायुक्तांनी अलीकडेच सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून ही कारवाई केली आहे.(प्रतिनिधी)