शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींनी भरला अडीच लाख दंड

By admin | Updated: May 9, 2014 02:18 IST

रेल्वेगाड्यात चढून प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे वसूल करायचे. एखाद्याने पैसे न दिल्यास अश्लील हावभाव करून त्यांना त्रस्त करून सोडायचे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असताना..

व्हेंडरला २२ लाखाचा फटका : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
नागपूर : रेल्वेगाड्यात चढून प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे वसूल करायचे. एखाद्याने पैसे न दिल्यास अश्लील हावभाव करून त्यांना त्रस्त करून सोडायचे. यामुळे प्रवासी त्रस्त झाले असताना मागील वर्षी 'आरपीएफ'च्या कारवाईत २२९ तृतीयपंथींकडून २.३0 लाख रुपये तर अवैध व्हेंडरकडून २२ लाख १६ हजार २९४ रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.
रेल्वेगाड्यात प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना तृतीयपंथींच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अश्लील हावभाव करून जबरदस्तीने पैसे वसूल करीत असल्यामुळे प्रवाशांचा नाईलाज होतो. कुटुंबासह प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना मागितले तेवढे पैसे काढून देण्याची पाळी येते. रेल्वे अँक्ट १४४ बी नुसार रेल्वेगाड्यात भीक मागणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे सन २0१३-१४ या आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षा दलाने विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांना पैशासाठी वेठीस धरणार्‍या २२९ तृतीयपंथींची धरपकड केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ लाख ३0 हजार रुपये दंड आकारला. परंतु असे असले तरी दंड भरून पुन्हा हे तृतीयपंथी दुसर्‍या दिवशी रेल्वेगाड्यात पैसे मागताना दिसतात. यामुळे त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशाच प्रकारे कुठलाही परवाना नसताना रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणे रेल्वे अँक्ट १४४ नुसार गुन्हा आहे. मागील वर्षी २ हजार ३८४ अवैध व्हेंडरवर कारवाई करून रेल्वे सुरक्षा दलाने २२ लाख १६ हजार २९४ रुपये दंड वसूल केला. याशिवाय रेल्वेस्थानकावर नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ५५२ नागरिकांवर रेल्वे अँक्ट १५९ नुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडूनही १ लाख ७३ हजार ६५0 रुपये दंड वसूल करण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी रेल्वे सुरक्षा दलाने पुरविली आहे. रेल्वे सुरक्षा दल तृतीयपंथी, अवैध व्हेंडर, नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणारे आदींविरुद्ध कारवाई करीत असले तरीसुद्धा दंड भरल्यानंतर पुन्हा हे आपल्या कामाला सुरुवात करीत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)