शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूमध्ये 'खेला'! अभिनेता विजयच्या पक्षाची मुसंडी; द्रमुकला धक्का
2
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
3
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
4
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
5
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
6
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
7
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
8
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
9
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
10
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
11
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
12
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
13
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
14
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
15
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
16
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
17
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
18
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
19
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
20
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकाराला फसविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: October 14, 2016 03:19 IST

मानकापूर येथे ५ आॅक्टोबर रोजी २ मुलांचा गळा कापण्याची घटना घडली होती. या घटनेचे वार्तांकन करणारे लोकमतचे पत्रकार जगदीश जोशी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून

नागपूर : मानकापूर येथे ५ आॅक्टोबर रोजी २ मुलांचा गळा कापण्याची घटना घडली होती. या घटनेचे वार्तांकन करणारे लोकमतचे पत्रकार जगदीश जोशी यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून त्यांना फसविण्याचा प्रयत्न एका महिलेने केला आहे. माझ्या सन्मानाला ठेच पोहचविणारे प्रश्न जोशी यांनी विचारल्याचा महिलेचा आरोप आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, मी मेयो रुग्णालयात असताना जगदीश जोशी तेथे आले. त्यांनी काही प्रश्न विचारले. त्यामुळे माझ्या सन्मानाला ठेच पोहचली. ५ आॅक्टोबरला मानकापूर गीतानगरात आरोपी विलास भागवत भुजाडे याने दोन मुलांचा गळा कापून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला लोकमतसह शहरातील इतरही वृत्तपत्रांनी प्रामुख्याने प्रकाशित केले होते. या घटनेचे कारण अनैतिक संबंध अथवा पैशाची देवाणघेवाण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. १३ आॅक्टोबर रोजी या महिलेने तहसील पोलीस ठाण्यात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत वापरण्यात आलेली भाषा महिला खुद्द वाचू शकणार नाही अशीच आहे. कुणीतरी ही तक्रार लिहून दिली असावी हे यावरून स्पष्ट होते. सध्या तहसिल पोलिसांनी प्रकरणाची चौकशी न करता जगदीश जोशी यांच्या विरोधात कलम ३५४ (अ/४) व ५०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आपली बाजू मांडताना जगदीश जोशी यांनी सांगितले की, मी या महिलेला ओळखत नाही. अन्य पत्रकारांसोबत या प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी मेयो रुग्णालयात गेलो होतो. या ठिकाणी कोण महिला उपस्थित होती हे सुद्धा मला माहीत नाही. ही बाब मेयो रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्हीद्वारे सिद्ध होऊ शकते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी. कुणाला खोट्या प्रकरणात फसविणे हा सुद्धा अपराध असल्याचे कदाचित या महिलेला माहीत नसावे. (प्रतिनिधी)