शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची रुग्णवाहिकेला धडक

By admin | Updated: June 3, 2015 02:42 IST

भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात रुग्णवाहिकेतील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कन्हान : भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात रुग्णवाहिकेतील दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आठजण गंभीर जखमी झाले. ही घटना कन्हान परिसरातील वराडा शिवारात सोमवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.अन्नपूर्णा राजेंद्र मडावी (३४) व निशा सरजिव रावते अशी मृत महिलांची नावे आहेत तर जखमींमध्ये गीताबाई वरिया (५९), सुधीर रावतेल (३५), मोनीराम उईके, रुग्णवाहिका चालक जगदीश डोंगरे (५२), अतुल वरिया, रूपेश काकोडे, शुभम काटोले, सौरभ मानकर या आठ जणांचा समावेश आहे. मनसर येथील मॅग्नीज ओर लिमिटेड (मॉयल)ची एमएच-४०/वाय-२८०७ क्रमांकाची रुग्णवाहिका नागपूर येथून रुग्णांवर उपचार करून मनसरकडे परत येत होती. दरम्यान,वराडा शिवारातील एका पेट्रोलपंपाजवळ गोंडेगाव खाणीतून कोळसा वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम-४०/७०५६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. यात रुग्णवाहिकेच्या चालकासह १० जण गंभीर जखमी झाले. जखमींना कन्हान येथील जे.एन. रुग्णालय व कामठीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अन्नपूर्णा मडावी व निशा रावतेल या दोन महिलांचा मृत्यू झाला. इतर आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या परिसरातील अपघात वाढले असून आतापावेतो तिघांचा अपघाती मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी)