शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय व्यावसायिकाला त्रास : जरीपटका पोलिसांची कारवाई

By admin | Updated: May 8, 2014 02:50 IST

स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत एका वैद्यकीय व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या टोळीतील दोन भामट्यांच्या जरीपटका पोलिसांनी मुसक्या बांधल्या

नागपूर : स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत एका वैद्यकीय व्यावसायिकाला खंडणी मागणार्‍या टोळीतील दोन भामट्यांच्या जरीपटका पोलिसांनी मुसक्या बांधल्या. अजय श्यामराव बारापात्रे (वय ३१) आणि फिरोज खान शमीउल्ला पठाण (वय ३३), अशी या भामट्यांची नावे आहेत. हे दोघेही यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागसेननगरात राहतात. डॉ. महिपाल व्यंकटराव सोनपिंपळे (वय ४५) हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. जरीपटक्यातील बाबा दीपसिंगनगरात (उप्पलवाडी) त्यांचा छोटासा दवाखाना आहे. ३ मेच्या दुपारी २ वाजता आरोपी अजय, फिरोज आणि त्यांचे साथीदार एका रुग्णाला घेऊन आले. या रुग्णाला अशक्तपणा आहे, त्यामुळे त्याला सलाईन लावून द्या, अशी मागणी त्यांनी केली. आपण आयुर्वेद चिकित्सक आहोत, त्यामुळे आपल्याला सलाईन लावता येणार नाही, असे सोनपिंपळे यांनी सांगितले. मात्र, आरोपींनी सलाईन लावण्याचा हेकाच धरला. अखेर सोनपिंपळे यांनी आरोपीच्या साथीदाराला सलाईन लावले. त्याची आरोपींनी मोबाईलच्या कॅमेर्‍यातून शूटिंग केली. त्यानंतर आरोपींनी सोनपिंपळेंना आपले असली रूप दाखवले. तुम्ही अँलोपॅथी डॉक्टर नसताना पेशंटला सलाईन कशी लावू शकता. उपचाराच्या नावाखाली तुम्ही रुग्णांची फसवणूक करता, त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळता, असे म्हणत त्यांनी तुमचा भंडाफोड करतो, असा दम दिला. आम्ही पत्रकार आहोत, तुमची शूटिंग विविध चॅनलवर दाखवतो, अशी धमकीही दिली. तुमची बदनामी होईल आणि तुमच्यावर पोलीस केसही होईल, हे टाळायचे असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपींनी सोनपिंपळेंना म्हटले. खंडणीची रक्कम आताच पाहिजे, असेही ते म्हणाले. या एकूणच प्रकारामुळे हादरलेल्या सोनपिंपळे यांनी बाजूलाच राहणार्‍या आपल्या कुटुंबीयांना बोलवून घेतले. कुटुंबीयांनी आरोपींचे हातपाय जोडून प्रकरण निस्तरण्याची विनंती केली. मात्र, आताच्या आता दोन लाख रुपये द्या अन्यथा तुमची खैर नाही, असा दम आरोपींनी दिला. त्यामुळे सोनपिंपळे कुटुंबीयांनी आरोपींना लगेच २0 हजार रुपये दिले. दुसर्‍या दिवशी (४ मे) १ लाख ८0 हजार देण्याचे ठरले. त्यामुळे आरोपी निघून गेले. संबंधित प्रकाराची तक्रार सोनपिंपळे यांनी जरीपटका ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. खंडणीचे १ लाख ८0 हजार घेण्यासाठी मंगळवारी रात्री ८.३0 वाजता आरोपींना बोलविण्यात आले. आरोपी अजय आणि फिरोज हे दोघे सोनपिंपळे यांच्याकडे पोहोचले. त्यांचे साथीदार दूर अंधारात दडून होते. खंडणीची रक्कम स्वीकारताच पोलिसांनी अजय आणि फिरोजच्या मुसक्या बांधल्या. ते दिसताच त्यांचे साथीदार पळून गेले. (प्रतिनिधी)