शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गँगमनच्या उपचारात रेल्वे रुग्णालयाची हयगय

By admin | Updated: April 24, 2016 03:16 IST

मागील १४ दिवसांपासून कंबरेच्या हाडाला गंभीर दुखापत झालेल्या गँगमनची शस्त्रक्रिया रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गुरुवारी आणखी लांबणीवर टाकून...

नागपूर : मागील १४ दिवसांपासून कंबरेच्या हाडाला गंभीर दुखापत झालेल्या गँगमनची शस्त्रक्रिया रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गुरुवारी आणखी लांबणीवर टाकून २५ एप्रिलला शस्त्रक्रिया करण्याचे ठरविल्यामुळे या कर्मचाऱ्याचा त्रास आणखीनच वाढला आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत गँगमन घनशाम डाबरे ७ एप्रिलला रेल्वे रुळाची देखभाल करीत असताना रुळ ठेवण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या स्लिपरवर पडला. यात त्याच्या कंबरेच्या हाडाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १५ दिवस उलटूनही संबंधित डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली नसल्यामुळे त्याचा त्रास आणखीनच वाढला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून अन्सारी नावाच्या खासगी डॉक्टरसोबत करार करण्यात आला आहे. डॉक्टरांनी घटनेच्या १० दिवसानंतर १८ एप्रिलला शस्त्रक्रिया करण्याची तारीख दिली. ही तारीख वाढवून २१ एप्रिल केली. २१ एप्रिलला प्राथमिक तपासणी केल्यानंतर पुन्हा त्यांना शस्त्रक्रियेसाठी २५ एप्रिल ही तारीख देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अन्सारी दोन दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. तिसरा दिवस रविवार असल्यामुळे आता घनशामवर सोमवारीच शस्त्रक्रिया होऊ शकणार आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. या साहित्याची व्यवस्था करण्याऐवजी शस्त्रक्रियेची तारीख वारंवार बदलण्यात आली. घनशामवर त्वरित उपचार न झाल्यास त्याला कायमचे अपंगत्व येऊन त्याची नोकरी जाऊ शकते, हे निश्चित.(प्रतिनिधी)