शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘डब्बा’ सीबीआयकडे सोपवा

By admin | Updated: August 26, 2016 02:49 IST

बहुचर्चित डब्बा प्रकरणाची व्याप्ती देश-विदेशात आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या मर्यादा येऊ शकतात.

पोलिस करणार सरकारकडे मागणी : पोलीस आयुक्तांचे संकेत नागपूर : बहुचर्चित डब्बा प्रकरणाची व्याप्ती देश-विदेशात आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या मर्यादा येऊ शकतात. ते लक्षात घेता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, असा मागणी वजा अहवाल शहर पोलीस राज्य शासनाकडे पाठविणार आहे. शहराचे मावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पत्रकारांशी चर्चा करताना तसे संकेत दिले. यादव यांची मुंबईला बदली झाली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था ही जबाबदारी ते सांभाळणार आहेत. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघ तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीने ‘पत्रकारांशी वार्तालाप’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात यादव यांनी पत्रकारांशी चर्चा केली. बहुचर्चित डब्बा प्रकरणाच्या अनुषंगाने पत्रकारांनी आयुक्त यादव यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रकरणात अनेक नेते, पांढरपेशे गुंतले असल्याची चर्चा होती. पोलीस अधिकारी आॅफ द रेकॉर्ड त्याला दुजोराही देत होते. मात्र तीन महिने होऊनही कुणाला अटक नाही, त्यांची नावेही उघड झाली नाही, असा प्रश्न केला असता काही प्रश्नांची उत्तरे गोपनीयतेमुळे देता येत नाही, मात्र, लवकरच यातील अनेक बाबींचा खुलासा होईल, असेही त्यांनी सांगितले. कित्येक लाख कोटींची सट्टेबाजी करणाऱ्या डब्बा व्यापारांमुळे अनेक जण बर्बाद झाले आहेत. डब्बा व्यापाऱ्यांचे नेटवर्क विविध राज्यांसह विदेशातही आहे. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी मर्यादा येतात. म्हणून हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असा निष्कर्ष शहर पोलिसांनी काढला आहे. त्यासंबंधाने आवश्यक अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अहवालावर काय निर्णय घ्यावा, ते शासन ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पोलिसांना ‘रिअ‍ॅक्टिव्ह’ केले : पोलीस आयुक्त नागपूर : शहरातील आपल्या १७ महिन्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच त्यांनी पोलिसांना ‘रिअ‍ॅक्टिव्ह’ (घटना घडल्यानंतर काही करण्यापूर्वी घटना घडूच नये यासाठी प्रयत्न) केले, असे शहराचे मावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यादव म्हणाले, २२ प्रकरणात मोक्काची कारवाई करून गुन्हेगारी ठेचून काढण्याचे प्रयत्न केले. रात्रंदिवसाची गस्त प्रभावी केली. बीट मार्शल, दर महिन्याला क्राईम मिटींगच्या माध्यमातून ठाणेदारांना सतत सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला. महिला आणि मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्याचे प्रयत्न केले. नागरिकांच्या हक्काच्या पार्किंगवर अतिक्रमण करण्यात येते, त्यासंदर्भात महापालिकडे वारंवार चर्चा करण्यात आली. मात्र, संबंधित प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुचाकी उचलून नेण्याच्या वाहतूक पोलिसांच्या तक्रारी वारंवार झाल्याचेही त्यांनी मान्य केले. अनेक प्रकरणात दलालांशिवाय कामच होत नव्हते. तक्रारकर्ते ठाण्यात जाण्याऐवजी दलालांकडे जायचे आणि दलाल त्यांना घेऊन ठाण्यात जायचे. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर दलालांना ठाण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत् केले. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारावर कारवाई होईल, त्याची दक्षता घेतली. त्यातून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झालो. शहरातील वाहतूक आणि पार्र्किंग विषयाशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे देताना राज्यात सर्वाधिक ड्रंक न ड्राईव्हच्या कारवाई नागपुरात केल्याचेही त्यांनी सांगितले. काही प्रकरणात राजकीय दडपण आल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, कोणतेही दडपण आले नाही अन् कुणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या दडपणात येण्याचा प्रश्न नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण काही टार्गेट ठरवून आलो नव्हतो. थोडे फार इकडे तिकडे झालेही असेल. मात्र, आपल्या कार्यकाळात झालेल्या कामगिरीवर आपण समाधानी आहोत. नवीन जबाबदारीला न्याय देण्याचाही आपण पूर्ण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. नागपूर हे एक सुंदर शहर आहे. येथील नागरिकही सकारात्मक विचार करणारे आहे. येथील पत्रकारांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केले. ते आपण कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली. (प्रतिनिधी)