शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती कृषी सहसंचालकांची बदली

By admin | Updated: July 9, 2014 00:54 IST

अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांची बदली करण्यात आली आहे. ते अद्याप नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असले तरी त्यांच्या जागेवर शिवराज सरदार परस्परच रूजू झाले आहेत.

शिवराज सरदार परस्पर रुजू : अशोक लोखंडे नियुक्तीच्या प्रतीक्षेत यवतमाळ : अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांची बदली करण्यात आली आहे. ते अद्याप नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असले तरी त्यांच्या जागेवर शिवराज सरदार परस्परच रूजू झाले आहेत. अशोक लोखंडे यांनी आपल्या कार्यकाळात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके जप्तीची धडक मोहीम राबविली. यावर्षी सुमारे ३० कोटी रुपयांचे बोगस बियाणे-खते जप्त करून दहा पोलीस ठाण्यात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही मोहीम जोरात असतानाच अचानक सोमवार दि. ७ जुलै रोजी लोखंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्या जागेवर शिवराज सरदार यांना नियुक्ती देण्यात आली. वास्तविक लोखंडे यांना आदिवासी विकास विभाग नाशिक येथे अप्पर आयुक्त (एटीसी) म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची शासनाची योजना होती. याबाबत चार महिन्यांपूर्वी लोखंडे यांची लेखी संमतीही घेतली गेली. या संमती पत्राच्या आधारेच सरदार यांची नियुक्ती करण्यात आली. लोखंडे यांच्या ‘रिक्त होणाऱ्या’ जागेवर असा स्पष्ट उल्लेख करून सरदार यांची सशर्त नियुक्ती करण्यात आली. मात्र लोखंडेंची जागा रिक्त होण्यापूर्वीच सरदार यांनी परस्परच एकतर्फी पदभार घेतला. याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी अशोक लोखंडे यांची प्रतिक्रिया संपर्क करूनही मिळू शकली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)लोखंडे मंत्रालयात, सरदार त्यांच्या खुर्चीत अशोक लोखंडे ७ जुलै रोजी बैठकीसाठी मुंबईला गेले होते. हीच संधी साधून सरदार यांनी अमरावतीत लोखंडे यांच्या खुर्चीचा ताबा घेतला.अमरावती ‘जेडीए’साठी औरंगाबादमधून फिल्डींग अमरावतीच्या कृषी सहसंचालक (जेडीए) पदावर वर्णी लावून घेण्यासाठी शिवराज सरदार यांनी थेट औरंगाबादमधून फिल्डींग लावली. तेथे सहसंचालक पदावर साडेतीन वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना पुणे आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली. मात्र त्यांनी तेथे रुजू न होता सुमारे वर्षभर ‘आजारी’ रजेवर राहून औरंगाबादच्या ‘सत्ता’धारी नेत्याकडून ‘सेटींग’ करीत अमरावतीत नियुक्ती मिळविण्यात अखेर यश मिळविले.