शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मौजमजेसाठी चोरी करणारा गजाआड

By admin | Updated: March 26, 2017 02:03 IST

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी आॅफिस बॉयला अटक करण्यात

पुणे : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी आॅफिस बॉयला अटक करण्यात आली आहे. चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. मौजमजेसाठी त्याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यासाठी बनावट चावीचा वापर करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. गोपाळ मच्छिंद्र धनगर (वय २६, सध्या रा. पाषाण. मूळ रा. मंगळूर, ता. चोपडा, जि. जळगाव) असे अटक केलेल्याआरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल रवींद्र बेहरे (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील चेतस कंट्रोल सिस्टीम्स या कंपनीमध्ये बेहरे हे अकाऊंट असिस्टंट म्हणून काम करतात. आरोपी धनगर हा मागील सात वर्षांपासून या कार्यालयात आॅफिस बॉय म्हणून काम करीत होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार करायचे असल्याने बेहरे यांनी धनगरला १८ मार्च रोजी बँक आॅफ इंडियाचा धनादेश देऊन पाच लाख रुपये काढून आणण्यास सांगितले होते. बँकेतून काढलेली ही रक्कम आणि आधीचे दोन लाख असे एकूण सात लाख रुपये बेहरे यांनी शिपाई प्रल्हाद साळुंखेकडे दिले होते. त्यांनी हे पैसे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयातील कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते. या ड्रॉव्हरला कुलूपही लावण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे ड्रॉव्हरमधून काढण्यासाठी गेलेल्या साळुंखे यांना एकच लाख रुपये दिसले. त्यांनी याची माहिती बेहरे यांना दिली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)