शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीत ३८३ खेळाडूंचे हाल

By admin | Updated: December 29, 2015 20:00 IST

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल ३८३ खेळाडूंचे सध्या बेहाल सुरू आहेत. पांघरुणाची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना रात्र कशीतरी कुडकुडत काढावी लागत आहे.

नरेंद्र कुकडे  - हिंगणाराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल ३८३ खेळाडूंचे सध्या बेहाल सुरू आहेत. पांघरुणाची अपुरी व्यवस्था असल्याने विद्यार्थ्यांना रात्र कशीतरी कुडकुडत काढावी लागत आहे. त्यातल्या त्यात जेवणात वाढला जाणारा भात हा कच्चा, भाजीलासुद्धा चव नाही. गेल्या २१ डिसेंबरपासून या विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. क्रीडा स्पर्धेसाठी आलेले असले तरी क्रीडा स्पर्धाच सुरू न झाल्याने आणखी किती दिवस त्यांना कुडकुडत राहावे लागेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.हिंगणा तालुक्यातील कवडस येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील हा प्रकार आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सराव व्हावा म्हणून आठ प्रकल्पातील तब्बल ३८३ खेळाडू सध्या तेथे आलेले आहेत. २१ डिसेंबरपासून त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी कवडसच्या आदिवासी आश्रमशाळेकडे देण्यात आली आहे. परंतु, सुमार दर्जामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. कच्चा भात, भाजी आणि रात्रीच्या वेळी पांघरुणाची अपुरी व्यवस्था यामुळे असंख्य खेळाडू आजारी पडल्याचे वास्तवचित्र तेथे बघावयास मिळते.  

कुठले किती खेळाडू?

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आठ प्रकल्पातील ३८३ खेळाडू आलेले आहेत. त्यामध्ये नागपूर प्रकल्पातील १३ मुले व २१ मुली, चिमूर येथून ८ मुले व ८ मुली, भंडारा येथून १४ मुले व ९ मुली, चंद्रपूर येथून २० मुले व १९ मुली, अहेरी येथून २४ मुले व १९ मुली, गडचिरोली येथून ३५ मुले व ३२ मुली, देवरी येथून ३८ मुले व ४४ मुली, भामरागड येथून ४० मुले व ३४ मुली आलेले आहेत. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकल्पातील एकूण ३७ शिक्षक आलेले आहेत, त्यामध्ये २९ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहेत. परंतु, क्रीडा स्पर्धेची तारीख अनिश्चित आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्या सर्वांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.  

कधी होणार स्पर्धा?

मानकापुरातील क्रीडा संकुलात राज्यस्तरीय स्पर्धा होणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी ३ ते ५ जानेवारी २०१६ पर्यंतचा कालावधी ‘फिक्स’ करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख मिळण्यास अडचण येत असल्याने स्पर्धेच्या तारखेबाबत अनिश्चितता असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याच गृहजिल्ह्यात खेळाडूंना होत असलेला त्रास आणि असुविधांबद्दल त्यांना माहिती मिळाल्यास त्यांच्यातर्फे निश्चितच कारवाई करण्यात येईल, हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र असे असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून आदिवासी विभाग कशात गुंतला आहे, हे कळायला मार्ग नाही.