शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मोरूच्या मावशीचा रंगमंचावर टाँग टिंग टिंगा....

By admin | Updated: July 7, 2014 01:10 IST

आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त विनोदी लेखणीतून अवतरलेले नाट्य म्हणजे ‘मोरूची मावशी...’ या नाटकाला रंगमंचावर ५० वर्षे झालीत पण त्यातले शाब्दिक विनोद प्रत्येक पिढीला भुरळ घालतात.

लोकमत सखी मंच : कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे आयोजन नागपूर : आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त विनोदी लेखणीतून अवतरलेले नाट्य म्हणजे ‘मोरूची मावशी...’ या नाटकाला रंगमंचावर ५० वर्षे झालीत पण त्यातले शाब्दिक विनोद प्रत्येक पिढीला भुरळ घालतात. फारसा अंगविक्षेप करून विनोद निर्मितीचा अट्टाहास नसलेले परिस्थितीसापेक्ष आणि भाषिक विनोद असलेल्या या दर्जेदार नाटकाने भरगच्च भरलेल्या सभागृहाला हास्याच्या धबधब्यात चिंब केले. अत्रे यांचा विनोद, मंगेश कदम यांचे कुशल दिग्दर्शन आणि भरत जाधव यांची ‘मोरूची मावशी’ एकदम ‘सहि रे सहि’ दाद द्यायला लावणारी होती. मोरूच्या मावशीने रंगमंचावर केलेला ‘टाँग टिंग टिंगा...’ गच्च भरलेल्या प्रेक्षकांची ‘नॉनस्टॉप’ हसवणूक करणारा होता. लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या नाटकाचा एक प्रयोग डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. सुयोग प्रकाशित आणि रसिकरंजन निर्मित मोरूच्या मावशीने धम्माल केली. नाटकातील कलावंतांना टाळ्यांची दाद देत सखी मंचच्या सदस्य आणि प्रेक्षकांनी हा प्रयोग एन्जॉय केला. बापुराव माने आणि त्यानंतर विजय चव्हाण यांनी मोरूची मावशी साकारली होती. गेली ५० वर्षे या नाटकाचे महाराष्ट्रात प्रयोग होत आहेत. त्यामुळे विजय चव्हाण यांना पाहिलेले अनेक प्रेक्षक पुन्हा या प्रयोगाला केवळ भरत जाधवचा अभिनय पाहण्यासाठी आले होते. नाटक सुरू असताना सभागृहात ‘फुल्ल लॉफ्टर’ सुरू असल्याने हसणे थांबेपर्यंत कलावंतांना ‘पॉज’ घ्यावा लागत होता. भय्या आणि मोरु हे दोन कॉलेजकुमार. दोघेही जरा उडाणटप्पू आणि घरासमोरच्या दोन मुलींना गटविण्याचा विचार करणारे. या दोन मुली म्हणजे महापौर टोणगे यांच्या दोन पुतण्या आहेत. भय्याचे काका कर्नल डोंगरे यांच्या आर्थिक पाठबळावर दोघेही एका बंगल्यात राहतात. मोरूची मावशी ही कांदा संस्थानची राणी. भय्या उषासाठी आणि मोरू निशासाठी झुरत असतात पण त्यांचा या दोघींशीही फारसा संबंध येत नाही. त्यात एक दिवस अचानक मोरूची मावशी मोरूला भेटण्यासाठी येणार असल्याची तार येते. हे निमित्त साधून सगळ्यांची एकत्रित भेट घालावी आणि एकत्र जेवण करावे, असा बेत भय्या आणि मोरु आखतात. पण कांदा संस्थानची राणी असलेली मोरूची मावशी आज येणार नसल्याची तार ऐनवेळी येते. एव्हाना साराच बेत ठरलेला असतो आणि समोर राहणाऱ्या उषा, निशानेही मावशीसोबत जेवण घेण्याचे मान्य केले असते. काय करावे, हा विचार करताच भय्या आणि मोरुचा मित्र नाट्यकलावंत बंड्या तेथे येतो. बंड्या नाटकात स्त्रीवेश करणाराही कलावंत असतो. सारा बेत फिस्कटण्यापेक्षा बंड्यालाच स्त्रीवेशात कांदा संस्थानची राणी म्हणून येण्याचे साकडे दोघेही घालतात. मोठ्या प्रयत्नाने बंड्या मित्रांसाठी तयार होतो. सारेच भोजनासाठी एकत्रित येतात. पण त्याचवेळी मोरुची कांदा संस्थानची राणी मोरुची मावशीही तेथे येते. पण आधीच तेथे मोरुची मावशी असल्याचे पाहून ती गप्प राहते. मोरुच्या खऱ्या मावशीसमोर मोरुच्या खोट्याच मावशीचा खेळ सुरू राहतो. त्यात कर्नल डोंगरे अविवाहित आणि महापौर टोणगेही मोरुच्या मावशीच्या प्रेमात पडतात. साराच गोंधळ रंगमंचावर तुफान हास्य निर्माण करतो. यात मोरुच्या मावशीची भूमिका साकारताना भरत जाधवने मजा आणली. परफेक्ट टायमिंग आणि विनोदाचे पंच भरतने नेमकेपणाने हेरल्याने योग्य पद्धतीने विनोदनिर्मिती रसिकांना बांधून ठेवण्यात कमालीची यशस्वी झाली आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि अशोक पत्की यांच्या संगीताने हा साराच गोंधळ आनंददायी झाला आहे. सर्वच कलावंतांनी यात जीव ओतून भूमिकेला न्याय दिला आहे. (प्रतिनिधी)अभिनेता भरत जाधव यांचे स्वागत नाटकाच्या प्रारंभी लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकमतचे तांत्रिक सल्लागार रमेश बोरा यांनी कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे शशिकांत आणि आरती बोदड यांचे स्वागत केले. यानंतर अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार शशिकांत बोदड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्याला प्रतिसाद दिला. काहींनी उभे राहूनही भरत जाधवचा सन्मान केला. या समारंभाचे निवेदन लोकमत सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.