शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंच ‘सखी सन्मान अवॉर्ड’चे आज वितरण

By admin | Updated: January 12, 2016 02:43 IST

लोकमत सखी मंच आणि युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मान करणारा ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध क्षेत्रांतील कार्यरत महिलांचा होणार गौरव : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी राहणार विशेष आकर्षणनागपूर : लोकमत सखी मंच आणि युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनिकच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सखींचा सन्मान करणारा ‘सखी सन्मान अवॉर्ड’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आज, मंगळवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याचे सहप्रायोजक रियल इन्स्टिट्यूट निर्मल उज्वल को-आॅपरेटिव्ह आणि रेखा नॅचरोकेअर सेंटर हे आहे.महिलांमधील कलागुणांना वाव देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करण्याचे कार्य लोकमत सखी मंच निरंतर करीत आले आहे. याच शृंखलेत लोकमत सखी मंचच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला-साहित्य, क्रीडा, साहस, आरोग्य या सात क्षेत्रात कार्यरत महिलांना गेल्या अनेक वर्षांपासून सन्मानितही करीत आहे. या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले असता ४०० पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले. निवड समितीने प्रत्येक क्षेत्रातून चार-चार नावांची निवड केली आहे. निवड समितीमध्ये पद्मश्री डॉ. विकास महात्मे, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रुपा कुळकर्णी, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, व्हीआयएच्या अध्यक्षा वंदना शर्मा, लोकमत समाचारच्या उपवृत्तसंपादक यामिनी रामपल्लीवार यांचा समावेश होता. नेत्रदीपक सोहळ््यामध्ये या पुरस्काराचे वितरण होईल. विशेष मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाचे आकर्षण वाढविणार आहे. कार्यक्रमाच्या नि:शुल्क पासेस संपल्या आहेत. उपस्थितांनी कार्यक्रमाला १५ मिनिट अगोदर येऊन स्थान ग्रहण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर सादर करणार गीतया कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर हे आहेत. याप्रसंगी पार्श्वगायक बांदोडकर हिंदी-मराठी गीत सादर करतील.