‘बायोफोकल’ची आज चेकलिस्ट

By Admin | Updated: June 29, 2014 00:46 IST2014-06-29T00:46:15+5:302014-06-29T00:46:15+5:30

अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने सुरू असलेल्या प्रक्रियेत रविवार, दि. २९ सायंकाळी पाच वाजता बायोफोकल अभ्यासक्रमाची चेकलिस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे.

Today checklist of 'Biofocal' | ‘बायोफोकल’ची आज चेकलिस्ट

‘बायोफोकल’ची आज चेकलिस्ट

मेरिट लिस्ट मंगळवारी : ३ जुलैपासून प्रवेशप्रक्रिया
नागपूर : अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने सुरू असलेल्या प्रक्रियेत रविवार, दि. २९ सायंकाळी पाच वाजता बायोफोकल अभ्यासक्रमाची चेकलिस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे. ३०पर्यंत यावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येतील व १ जुलै रोजी अंतिम गुणवत्तायादी जाहीर करण्यात येईल.
१८ जूनपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात झालेल्या ८.९४ टक्के वाढीचा परिणाम अर्जविक्रीवर दिसून आला. विज्ञान शाखेसाठी १५ हजार २२६, द्विलक्षी अभ्यासक्रमात २१ हजार ३२२, वाणिज्य (मराठी) २ हजार ९२, वाणिज्य इंग्रजीमध्ये ३ हजार हजार ३०३, वाणिज्य हिंदीसाठी ७७०, कला शाखेत मराठी माध्यमासाठी ७५२, हिंदीसाठी ३०८ तर इंग्रजीसाठी ८६ अर्ज आले होते. कला शाखेत ५ हजार १९४, वाणिज्य शाखेत ७ हजार ५८० तर विज्ञान शाखेत ८ हजार ३४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विज्ञान शाखेच्या द्विलक्षी अभ्यासक्रमात ५, २५२ जागा आहेत. यात इलेक्ट्रॉनिक्स विभागात १ हजार ८८९, कॉम्प्युटर सायन्समध्ये १ हजार २२२, फिशरीमध्ये २७७ जागांचा समावेश आहे. त्यानुसार यात न्यू इंग्लिश हायस्कूल महाल, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय, सक्करदरा, धनवटे नॅशनल कॉलेज, काँंग्रेसनगर, सिंधी हिंदी हायस्कूल पाचपावली आदींचा समावेश आहे. ३ जुलैपासून द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेस सुरवात होईल.
११ जुलैपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया चालेल. यानंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेची गुणवत्तायादी घोषित करून प्रवेश देण्यात येईल. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहील.
यातूनच बायोफोकल आणि बेसिक सायन्सकडेच विद्यार्थ्यांचे सर्वाधिक आकर्षण असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)

Web Title: Today checklist of 'Biofocal'