शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा प्रकल्पावर उत्तरासाठी शासनाने घेतला वेळ

By admin | Updated: January 11, 2016 02:58 IST

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार,..

हायकोर्ट : २८ जानेवारी रोजी पुढील सुनावणीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन ४० वर्षे लोटली असली तरी, काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निम्न पैनगंगा प्रकल्प निर्माण, समस्या निवारण व पुनर्वसन कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय भुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून प्रकल्प पूर्ण करण्याबाबत शासन किती उदासीन आहे, हे दाखविणारे मुद्दे मांडले आहेत. यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाने गेल्या गुरुवारी न्यायालयाला आणखी तीन आठवड्याची मुदत मागून घेतली. यामुळे प्रकरणावर २८ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर व नांदेड आणि तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्याचा या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये समावेश होतो. लाभक्षेत्रात महाराष्ट्रातील एकूण १ लाख ४० हजार ८१८ हेक्टर तर, तेलंगणातील एकूण १९ हजार २३२ हेक्टर जमीन येते. राज्य शासनाने १९ आॅगस्ट २००४ रोजी अधिसूचना जारी करून यवतमाळ, चंद्रपूर व नांदेड जिल्ह्याला आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे. येथील नागरिकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. वनक्षेत्र असल्यामुळे या भागात औद्योगिकीकरण झाले नाही. शेती सुपीक नसल्यामुळे नागरिकांचा आर्थिक विकास झालेला नाही. अदिलाबाद जिल्ह्याचीदेखील हीच अवस्था आहे. तेलंगणा राज्य निर्मितीपूर्वी अदिलाबाद आंध्र प्रदेशमध्ये होते. यामुळे या चारही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश शासनाने १९७५ मध्ये निम्न पैनगंगा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु शासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. सुरुवातीला प्रकल्पाचा अपेक्षित खर्च १४०२ कोटी ४२ लाख रुपये होता. २००७-०८ मध्ये हा खर्च वाढून ३३२९ कोटी रुपये झाला, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)