शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पोलीस व्हॅनमध्ये कुख्यात गुंडाचा ‘टिक-टॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 09:29 IST

पोलीस व्हॅनमध्ये एका कुख्यात गुंडाने ‘टिक टॉक ' व्हिडिओ बनविला. गुंडाचा हा टिक टॉक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देव्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : कोराडीत गुन्हा दाखल

नागपूर : पोलीस व्हॅनमध्ये एका कुख्यात गुंडाने ‘टिक टॉक ' व्हिडिओ बनविला. गुंडाचा हा टिक टॉक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. लपवण्यासाठी कोराडी पोलिसांनी शासकीय वाहनाचा गैरवापर करण्याच्या आरोपाखाली कुख्यात गुंड सैयद मोबीन अहमद (रा. संघर्ष नगर, टिपू सुलतान चौक) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. कुख्यात मोबीन हा कुख्यात चामा टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सध्या तडीपारसुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी मोबीनचा भाऊ सेबू याला यशोधरानगर पोलिसांनी वाहन चोरीच्या आरोपात अटक केली होती. चामा टोळी मोठी वाहने चोरी करून त्याचा जनावरांची तस्करी करण्याासाठी वापर करते.

पोलिसांनी वाहन पकडल्यास चालक वाहन सोडून पळून जातो. त्यामुळे चामा टोळीचे कोणतेही नुकसान होत नाही. मोबीनविरुद्धवरोरा, वणी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मोबीनने पोलिसांवरही हल्ले केले आहेत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोबीनचे गुंड गुरे चोरण्याची कामे करतात. ती गुरे आदिलाबाद येथे कत्तलीसाठी विकल्या जातात. आतापर्यंत मोबीनची अनेक वाहने वणी, राजनांदगाव येथील पोलीस ठाण्यात जप्त आहेत. अशा या कुख्यात गुंडासोबत अर्थपूर्ण मैत्री करणाऱ्या पोलिसांनी त्याला शासकीय वाहनात नेताना भाऊबंदासारखी वागणूक दिली. त्याला मोबाईलही हाताळू दिला. या मोबाईलमध्ये बसून मोबिनने कोराडी परिसरात आपला ‘टिक टॉक ' व्हिडिओ बनविला. तो मित्रांना तसेच गुंड साथीदारांना पाठविला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात पोलिसांचे वाहनही दिसते. या प्रकारामुळे पोलिसांची प्रतिमा चांगलीच मलिन झाली. दरम्यान, प्रसार माध्यमातून हा टीकेचा विषय ठरल्याने सावरासावर करण्यासाठी कोराडी पोलिसांनी मोबीनविरुद्ध गुरुवारी शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला. 

त्या पोलिसांचे काय?मोबीनविरुद्ध जुजबी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याला व्हिडीओ बनविण्याची मुभा देणाऱ्या पोलिसांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून, वरिष्ठांमध्ये या संबंधाने कारवाईसाठी मंथन सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया