शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

महाराज बागेतील वाघिणीला मिळणार जोडीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:34 IST

मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे.या वाघिणीला जोडीदार मिळावा यासाठी महाराज बाग प्राणिसंग्रहालयाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. वरिष्ठांकडे पाठपुरावाही सुरू होता. अशातच, चार जणांचे बळी घेणाऱ्या या नर वाघाला ब्रह्मपुरी येथून १९ जुलैला जेरबंद करून आणले होते. देखभाल आणि उपचारासाठी त्याला गोरेवाडामध्ये ठेवण्यात आले होते. गोरेवाडामध्ये प्राण्यांचे पिंजरे पूर्ण भरल्याने आणि आणि महाराज बाग व्यवस्थापनाकडून होत असलेली मागणी लक्षात घेता या वाघाला पुढील आदेशापर्यंत महाराज बागेत पाठविण्याच्या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे. गोरेवाडा प्राणी बचाव केद्राचे विभागीय व्यवस्थापक आणि महाराज बाग प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांना मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पत्रद्वारे हे आदेश दिले आहेत.झालेल्या निर्णयानुसार, या वाघाला बुधवारी सकाळी महाराज बागेत आणले जात असून पुढील आदेशापर्यंत त्याला येथे ठेवले जाणार आहे. सध्या येथे असलेल्या ‘जान’ या वाघिणीच्या दोन बहिणींपैकी एक ‘ली’ हिला ब्रिडींगसाठी गोरेवाडा येथे नेण्यात आले आहे तर दुसरी ‘चेरी’ हिला छत्तीसगडमधील काननपैंढरी येथील प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. १२ वर्षांची असलेली जान मागील काही वर्षांपासून एकटीच होती.नागरिकांना पाहाण्यासाठी नाहीपुढील काळात एनटी-१ ला निसर्गमुक्त करावे किंवा कायम पिंजऱ्यात ठेवावे याबद्दल समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना पाहण्याची सध्यातरी अनुमती नाही. या संदर्भात सीझेडचे आदेश आल्यावर निर्णय घेतला जाइल, असेही काकोडकर यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे ‘जान’च्या वाट्याला आलेले एकाकी जीवन आता संपणार आहे. मागील अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांचे मोठे योगदान आहे. नागपूरकरांचीही या मागणीला साथ होती. त्याला आता यश आले आहे.सुनील बावीसकर, प्रभारी व्यवस्थापक, महाराज बाग प्राणिसंग्रहालय

टॅग्स :TigerवाघMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर