शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पारडसिंगा जंगलात ‘व्याघ्र’ दर्शन!

By admin | Updated: March 1, 2016 02:49 IST

सती अनसूया मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध काटोलशेजारच्या पारडसिंगा येथील जंगलात एक पट्टेदार वाघ दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे.

वन विभागाचा वॉच : मध्य प्रदेशातून आल्याचा अंदाज नागपूर : सती अनसूया मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध काटोलशेजारच्या पारडसिंगा येथील जंगलात एक पट्टेदार वाघ दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. वन विभाग या वाघावर २४ तास वॉच ठेवून असून, कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याच्या प्रत्येक हालचाली टिपल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यासाठी पोलिसांची मदत घेतली जात असून, केंद्रीय सुरक्षा पथकाला तैनात करण्यात आले आहे. माहिती सूत्रानुसार, सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी तो या जंगलात दाखल झाला आहे. तेव्हापासून त्याने येथे ठाण मांडले आहे. सुरुवातीला तो शेजारच्या पेंच वा बोर व्याघ्र प्रकल्पातून आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या त्याच्या छायाचित्रावरून तो या दोन्ही व्याघ्र प्रकल्पातील नसल्याचा निष्कर्ष व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय काही जाणकार तो मध्य प्रदेशच्या जंगलातील असल्याचा कयास लावत आहे. मात्र अजूनपर्यंत तो नेमका कुठून आला, याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. सुरुवातीला या वाघाविषयी गावकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात होती. परंतु आता त्यांना वाघाच्या अस्तित्वाचे फायदे जाणवू लागले आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मते, या वाघाच्या अस्तित्वामुळे इतर वन्यप्राण्यांमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान अचानक थांबले आहे. मागील अनेक वर्षांनंतर प्रथमच या वन परिक्षेत्रात पट्टेदार वाघाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीयुक्त कुतूहल व्यक्त केले जात आहे. मागील काही वर्षांत वाघांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)गावकऱ्यांनी संयम राखावा साधारण वाघ म्हणजे वन विभाग असाच समज आहे. परंतु वाघाची सुरक्षा ही केवळ वन विभागाचीच जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. पारडसिंगा राऊंडमधील या वाघावर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी भयभीत होण्याचे कारण नाही. गावकऱ्यांनी संयम ठेवून, वन विभागाला सहकार्य करावे. वन विभाग वाघ कुठून आला, याचाही शोध घेत आहे. कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक