शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र गणना

By admin | Updated: May 9, 2014 01:12 IST

वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येत आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह मानसिंगदेव, बोर, उमरेड कर्‍हांडला व टिपेश्वर अभयारण्यात तयारी सुरू केली आहे.

वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह : वन विभागाची तयारी
नागपूर : वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येत आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह मानसिंगदेव, बोर, उमरेड कर्‍हांडला व टिपेश्वर अभयारण्यात तयारी सुरू केली आहे. जंगलातील पाणवठ्याशेजारी मचाण तयार केल्या जात आहेत.
वन विभागाच्या वेळापत्रकानुसार येत्या १४ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यानंतर रात्रभर जंगलातील मचाणीवर बसून वाघासह विविध वन्यजीवांची प्रगणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात वन्यजीवप्रेमींना प्रत्येक सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये या प्रगणनेविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूकांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार वन्यजीव विभागाकडे आतापर्यंत सुमारे १५० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष प्रगणनेसाठी वन विभागाने एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार या प्रगणनेत सहभागी होणार्‍यांना त्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागेल. वन विभागाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मचाणीवरील वन्यजीवप्रेमींसोबत एक वन विभागाचा प्रतिनिधी राहणार आहे. शिवाय मचाणवर बसल्यानंतर कुणालाही एकदुसर्‍यांशी बोलता येणार नाही. तसेच रात्रीला सर्च लाईट, पॉलिथीन वा बॅग सोबत बाळगता येणार नाही. सोबतच मोबाईलमधील कॅमेर्‍याचा फ्लॅशचा उपयोग करू नये. अशाही सूचना देण्यात आल्या आहे. यापूर्वी केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या विशिष्ट पद्घतीनुसार गत २०१० व २०१४ मध्ये देशभरात व्याघ्र प्रगणना करण्यात आली आहे. तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातूनही वाघांची अचूक आकडेवारी गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र असे असताना, बुद्ध पौर्णिमेच्या प्रगणनेचे एक वेगळे महत्त्व आहे.