शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉली उलटून तीन कामगार ठार

By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST

विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला.

चार गंभीर : बोरीघिवारी शिवारातील घटनाकोदामेंढी : विजेचे खांब घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तीन कामगारांचा दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य चार कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना मौदा तालुक्यातील तोंडली - वायगाव मार्गावरील बोरी (घिवारी) शिवारात शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. मृत तिन्ही कामगार कोदामेंढीचे असल्याने गुडीपाडव्याच्या दिवशी गावात शोककळा पसरली. विकास वसंता मोहनकर (२१), सुजीत कचरू सलामे (२५) आणि कार्तिक गेंदलाल वरखडे (२२) तिघेही रा. कोदामेंढी, ता. मौदा अशी मृत कामगारांची नावे असून, जखमींमध्ये राजकुमार बिरशा पंधरे (४०, रा. कोदामेंढी, ता. मौदा), धनराज पूरण गाडेकर (४७, रा. शिवाडौली, ता. मौदा), देवचंद अंकला चटवापाच (४५, रा. शिवाडौली, ता. मौदा) व अतुल तुळशीराम हटवार (२०, रा. कोदामेंढी, ता. मौदा) या चार कामगारांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात विजेचे खांब बदलविण्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे कंत्राट रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले आहे. यातील काही कामांचे कंत्राट जय बजरंग इलेक्ट्रिकल्स कंपनीने रुद्रानी कंपनीकडून घेतले आहे. हे सर्व कामगार या कंपनीकडे खांब उभारण्याचे काम करायचे. दरम्यान, वायगाव शिवारात खांब उभारण्याचे काम सुरू असल्याने या कामगारांनी एमएच- ४०/ए-२७४४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विजेच्या खांबासह इतर साहित्य टाकले आणि ते स्वत: ट्रॉलीमध्ये बसून कोदामेंढीहून तोंडली मार्गे वायगावला जाण्यास निघाले. हा ट्रॅक्टर कोदामेंढी येथील कृष्णा मसराम यांच्या मालकीचा आहे. माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी ट्रॉलीखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात विकास, सुजीत आणि कार्तिक या तिघांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी अतुलला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित तिघांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उत्तरीय तपासणी आटोपल्यानंतर सायंकाळी तिघांच्या पार्थिवावर कोदामेंढी येथील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोदामेंढी येथे शोककळा पसरली होती. (वार्ताहर)रोडच्या उताराने केला घातया ट्रॉलीमध्ये एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला तीन असे एकूण सिमेंटचे सात खांब ठेवण्यात आले होते. सारंग मेश्राम हा ट्रॅक्टर चालवित होता. हा ट्रॅक्टर बोरी (घिवारी) शिवारात पोहोचताच ज्या बाजूला चार खांब ठेवण्यात आले होते, त्या बाजूने ट्रॉली उलटली. विशेष म्हणजे, या चार खांबांच्या बाजूने रोडला अधिक उतार होता. ट्रॉली उलटताच ट्रॅक्टर रोडवर आडवा झाला आणि सातही कामगार ट्रॉलीखाली दबल्या गेले. त्यात तिघांचा मृत्यू झाला.