शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलमुक्तीची त्रिसूत्री, कॅडरसह केले फंडिंगवर प्रहार; हजारो नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:44 IST

Nagpur : नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने सुरक्षायंत्रणांकडून वेगाने पावले टाकण्यात येत आहेत. संघटित प्रयत्नांतूनच घातक नक्षलवाद्यांचा खात्मा, हजारो नक्षल्यांचे आत्मसमर्पण शक्य झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने सुरक्षायंत्रणांकडून वेगाने पावले टाकण्यात येत आहेत. संघटित प्रयत्नांतूनच घातक नक्षलवाद्यांचा खात्मा, हजारो नक्षल्यांचे आत्मसमर्पण शक्य झाले आहे. मात्र सुरक्षायंत्रणांनी केवळ नक्षल्यांना 'बुलेट 'नेच प्रत्युत्तर दिलेले नसून नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्या 'फंडिंग' वरदेखील प्रहार करत त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, झारखंड येथील नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असून सुरक्षायंत्रणांची कठोर कारवाई, आर्थिक नाकेबंदी आणि विकासकामांचा त्रिसूत्री फॉर्म्युला प्रभावी ठरत असून नक्षलवाद आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे चित्र आहे.

सुरुवातीच्या काळात नक्षलवाद्यांना थेट चकमकींमधून 'बुलेट' ने प्रत्युत्तर दिले जात होते. मात्र अलीकडच्या काळात सुरक्षायंत्रणांनी अधिक व्यापक दृष्टिकोन स्वीकारत नक्षलवाद्यांच्या फंडिंग नेटवर्क, बेकायदेशीर खंडणी, जंगलातील अवैध व्यापार, वाहतूक आणि मध्यस्थ यंत्रणांवर नियोजनबद्ध कारवाया केल्या. आर्थिक स्रोत आटल्याने नक्षल गटांची हालचाल, भरती प्रक्रिया आणि शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. याचाच परिणाम म्हणून २०२५ पासून अडीच हजारांहून अधिक नक्षल्यांनी शरणागती पत्करली असून संघटनांमध्ये फूटही पडल्याचे दिसून आले. नक्षलविरोधी कारवाईसोबतच सरकारकडून विकासाची चाकेही वेगाने फिरवली जात आहेत. यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांचा मुख्य प्रवाहाशी संपर्क वाढला आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने स्थानिक तरुणांचा नक्षल चळवळीकडे ओढा कमी होत आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी पुनर्वसन योजना व कौशल्य प्रशिक्षण राबविले जात असल्याने त्यांना नव्या आयुष्याची दिशा मिळत आहे.

'एकलव्य'च्या माध्यमातून शिक्षणाची गंगा

नक्षलप्रभावित गावांमधील मुलांना शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'एकलव्य मॉडेल' निवासी शाळांची योजना सुरू करण्यात आली होती. सद्यस्थितीत याअंतर्गत १७९ शाळा कार्यरत आहेत. तसेच तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ४६ आयटीआय व ४९ कौशल्य विकास केंद्रेदेखील उघडण्यात आली आहेत.

दुर्गम भागात आर्थिक साक्षरता

एकेकाळी नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या दुर्गम गावांमध्ये पोस्ट ऑफिस, बँकांच्या शाखा उघडण्यासाठीदेखील अनेक अडथळे होते. मात्र आता या भागातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता यावी यासाठी १ हजार ८०४ बँकांच्या शाखा तसेच १ हजार ३२१ एटीएम उघडण्यात आले आहे. तसेच पोस्ट विभागाकडून बँकांच्या सेवा असलेल्या पोस्ट ऑफिसेसची संख्या ६ हजार २५ पर्यंत गेली आहे.

९ हजार २३३ मोबाईल टॉवर्स

काही वर्षांअगोदर नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी दुचाकीने जाण्याची सोयदेखील उपलब्ध नव्हती. मात्र आता गडचिरोली, दक्षिण छत्तीसगड, झारखंड यांच्यासह नक्षलग्रस्त भागांमध्ये चांगले रस्ते तयार झाले आहेत. गेल्या काही कालावधीत या भागांमध्ये 'आरआरपी' (रोड रिक्वायरमेंट प्लॅन) व 'आरसीपीएलडब्लूईए' अंतर्गत १५ हजार १६ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. यासोबतच या भागांमध्ये टेलिकॉम कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी ९ हजार २३३ टॉवर्स उभारण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Naxal-Free Strategy: Funding Crackdown Leads to Surrenders, Development Boost

Web Summary : A three-pronged strategy of security operations, financial blockade, and development initiatives is weakening Naxalism in Maharashtra, Chhattisgarh, and Jharkhand. Over 2,500 Naxals have surrendered since 2025 due to the crackdown on funding and increased development in tribal areas, including schools, job training, and improved infrastructure.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीnagpurनागपूर