चार कोटींच्या घोटाळ्यातील तिघांना जामीन नाकारला

By Admin | Updated: May 7, 2015 02:14 IST2015-05-07T02:14:21+5:302015-05-07T02:14:21+5:30

पाचपावली येथील सिंधी हिंदी हायर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील ४ कोटी १७ लाख ७५ हजाराच्या...

Three out of four crores scam denied bail | चार कोटींच्या घोटाळ्यातील तिघांना जामीन नाकारला

चार कोटींच्या घोटाळ्यातील तिघांना जामीन नाकारला

नागपूर : पाचपावली येथील सिंधी हिंदी हायर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील ४ कोटी १७ लाख ७५ हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
जयंत विशनदास तोलानी (५९) रा. कृषी ले-आऊट जरीपटका, हुंदराज माणिकराय ताराणी (५४) रा. हुडको कॉलनी जरीपटका आणि भागचंद अर्जुनदास चेलानी (६२) रा. हिंगणा टी पॉर्इंट अंबाझरी, अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी २००१ पासून या संस्थेत घोटाळा केला. त्यांनी हिशेबाचे बनावट दस्तऐवज तयार करून त्याचा वापर करून संस्थेच्या सुमारे ४०० सदस्यांच्या ४ कोटी १७ लाख ७५ हजार २४५ रुपयाच्या रकमेचा घोटाळा केला. निशा होलाराम मेठवानी यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी १० सप्टेंबर २००९ रोजी गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. पोलीस निरीक्षक एस.पी. मदने हे तपास करीत आहेत. या आरोपींना १६ एप्रिल २०१५ रोजी अटक करण्यात आली. ते सध्या कारागृहात आहेत. यापूर्वी त्यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो ३ आॅक्टोबर २०१३ रोजी फेटाळण्यात आला होता. आरोपींपैकी जयंत तोलानी याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तो ३० नोव्हेंबर २०१३ रोजी फेटाळण्यात आला होता. अटकेनंतर आरोपींनी केलेला जामीन अर्जही फेटाळण्यात आला. सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. श्याम देवाणी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Three out of four crores scam denied bail