शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

वीज काेसळून तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पाेलीसपाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झाेपडीत आश्रय घेतला. त्यातच ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पाेलीसपाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झाेपडीत आश्रय घेतला. त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट झाेपडीवर काेसळली. त्यामुळे हाेरपळलेल्या तिघांचा झाेपडीतच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रामटेक शहरात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पाेलीसपाटील, मजूर व गुराख्याचा, तर जखमींमध्ये शेतकरी व १२ वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना चाेरखुमारी (ता. रामटेक) शिवारात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

याेगेश अशाेक काेकण (३०), मधुकर सावजी पंधराम (५५, दाेघेही रा. चाेरखुमारी, ता. रामटेक) व दिलीप मंगल लांजेवार (४२, रा. डाेंगरी, ता. रामटेक) अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये हरिसिंग धाेंडबा सराेते व नेहाल रामसिंग कुमरे (१२ दाेघेही रा. चाेरखुमारी, ता. रामटेक) यांचा समावेश आहे.

हरिसिंग सराेते यांची गावालगत शेती असून, त्यांनी पाेलीसपाटील याेगेश काेकण यांचा ट्रॅक्टर मशागतीसाठी किरायाने घेतला हाेता. दिलीप लांजेवार यांच्या शेतात कामाला हाेते, तर मधुकर पंधराम व त्यांना नातू नेहाल शेतालगत त्यांच्या गाई चारत हाेते. दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमाराच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या सर्वांनी शेतात असलेल्या झाेपडीत आश्रय घेतला.

त्यातच जाेरात कडाडलेली वीज थेट झाेपडीच्या मध्यभागी काेसळली. यात झाेपडीतील पाचही जण हाेरपळल्याने गंभीर जखमी झाले. शिवाय, याेगेश काेकण, मधुकर पंधराम व दिलीप लांजेवार यांचा झाेपडीतच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळताच देवलापार (ता. रामटेक) पाेलीसही घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी दाेन्ही जखमींना उपचारासाठी तर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्या दाेघांची प्रकृती स्थिर व धाेक्याबाहेर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. या घटनेमुळे चाेरखुमारी गावात शाेककळा पसरली आहे. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.