शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल युगाचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:28 IST

डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे. एमएलए होस्टेल येथे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर व गणेश कनाटे यांच्या उपस्थितीत हे अनोखे साहित्य संमेलन रंगणार आहे.

ठळक मुद्देफेसबुक पेजवरून बहरलेली साहित्य चळवळ : १६ व १७ ला आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होऊ घातले आहे. एमएलए होस्टेल येथे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर व गणेश कनाटे यांच्या उपस्थितीत हे अनोखे साहित्य संमेलन रंगणार आहे.व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखे डिजिटल युगाचे समूह माध्यम आता केवळ संवादाचे नाही तर साहित्याचेही माध्यम ठरू पाहत आहे. दररोज असंख्य तरुण व नव्या दमाचे लेखक, कवी यावर व्यक्त होऊ लागले आहेत. अशा नवसाहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम काही लोकांनी केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे साहित्यिक व नाटककार विक्रम भागवत होय. भागवत यांनी पाच वर्षापूर्वी ‘न लिहिलेले पत्र’ या नावाने एक फेसबुक पेज सुरू केले. आश्चर्य म्हणजे अल्पावधीत या पेजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मानसशास्त्र, मानवी नातेसंबंध, चित्रपट समीक्षा रसग्रहण, आयुर्वेदिक मते असे साहित्यिक, सामाजिक भान जपणारे व मानवी भावभावनांचे चित्रण करणारे विषय पत्रमालिकांच्या माध्यमातून असंख्य लोकांकडून पेजवर व्यक्त होऊ लागले. आजपर्यंत सात हजाराच्यावर पत्र या पेजवरून प्रकाशित झाले. या पेजला व्यापक रूप देत भागवत यांनी सुनील गोवर्धन व जयंत पोंक्षे यांच्या सहकार्याने बुक हंगामा डॉट कॉम हे वेब स्टोअर सुरू केले. या स्टोअरवर गेल्या तीन वर्षात एक हजाराहून अधिक डिजिटल व ई-बुक्स तसेच २०० हून अधिक ऑडिओ बुक्स प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी नुुक्कड हे लघुकथांचे व्यासपीठ सुरू केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी लेखक व वाचकांनी हे व्यासपीठ समृद्ध केले. चारोळ्यापासून कथापर्यंत सर्वच यावर प्रकाशित होऊ लागले. एक हजाराहून लघुकथा यावर प्रकाशित झाल्या. नुक्कडवरील साहित्याला साहित्य संमेलनाचे रूप आयोजकांनी दिले असून त्याचे तिसरे संमेलन नागपुरात होत आहे.संमेलनात राज्यातून १५० लेखक सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक स्वाती धर्माधिकारी यांनी दिली.पहिल्या दिवशी ९.३० ते १ वाजतादरम्यान विक्रम भागवत यांच्या कथा अभिवाचनानंतर संमेलनाचे उद््घाटन होईल. गणेश कनाटे व माधवी वैद्य हे बीजभाषण करतील. यासोबतच चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्यासह ‘एक पान कवितेचे एक पान चित्रांचे’चे सादरीकरण होईल. पहिल्या सत्रात सतीश तांबे यांच्या अध्यक्षतेत ‘कथा आता कुठे’ विषयावर चर्चासत्र व नंतर ‘जगेल?’ विषयावर परिसंवाद होईल. यानंतर विविध विभागातून निवडण्यात आलेल्या ५० लेखकांना नुक्कड पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सायंकाळी डॉ. प्राजक्ता हसबनीस व साथीदारांसह ‘बोलावा विठ्ठल’ हा कार्यक्रम सादर होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता नाट्यकर्मी सदानंद बोरकर यांच्यासह झाडीपट्टी रंगभूमीवर सादरीकरण होईल. यानंतर नुक्कड साथीदारांसह कवी संमेलन व दुसऱ्या सत्रात स्वाती धर्माधिकारी यांच्यासह नुक्कड कथा अभिवाचन होईल. दुपारी ३.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल.

 

टॅग्स :digitalडिजिटलliteratureसाहित्य