श्रीसूर्याचा ‘थिंक टँक’ गजाआड

By Admin | Updated: June 11, 2015 02:49 IST2015-06-11T02:49:37+5:302015-06-11T02:49:37+5:30

शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि रविराज या कंपन्यांचा ‘थिंक टँक’ समजल्या जाणाऱ्या...

'Think Tank' Gazaad | श्रीसूर्याचा ‘थिंक टँक’ गजाआड

श्रीसूर्याचा ‘थिंक टँक’ गजाआड

न्यायालय : मनोज तत्वादीची कारागृहात रवानगी
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि रविराज या कंपन्यांचा ‘थिंक टँक’ समजल्या जाणाऱ्या प्रतापनगर येथील मनोज तत्वादी याला बुधवारी सकाळी आर्थिक गुन्हे पथकाने अटक केली.
पोलिसांनी तत्वादीला एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करून त्याच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकार पक्ष न्यायालयात आरोपीच्या विरोधात ठोस माहिती सादर करण्यास अपयशी ठरल्याने न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांडची मागणी नामंजूर करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
तत्वादी हा श्रीसूर्याच्या इन्फोटेक आणि हेल्थ केअर या दोन कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचे एक पत्र सेबीकडून आर्थिक गुन्हे पथकाला प्राप्त होताच त्याला अटक करण्यात आली. त्याचे समीर जोशीसोबत स्टॉक एक्सचेंजमध्ये डिमॅट अकाऊंट असल्याचेही आढळून आले आहे.
सूर्यदेव लॉजिस्टिक एज्युकेशन डेव्हलपमेंट कंपनीत स्वत: मनोज तत्वादी, समीर जोशी, प्रशांत वासनकर आणि रविराज कंपनीचा राजेश जोशी हे संचालक आहेत.
तत्वादी काळ्या धंद्यांचा सूत्रधार
श्रीसूर्याचा ‘थिंक टँक’ गजाआड
नागपूर : सूर्यदेव लॉजिस्टिकने एक हॉटेल खरेदी केलेले आहे. तत्वादी हा या सर्व कंपन्यांच्या काळ्या धंद्यांचा मुख्य सूत्रधार आहे. घोटाळ्यांचे प्रशिक्षणच तो देत होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचे घोटाळे चव्हाट्यावर आणण्यासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली आर्थिक गुन्हे पथकाने सुरू केल्या आहेत. दरम्यान न्यायालयाने तत्वादीला न्यायालयीन कोठडी सुनावताच त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालय अर्ज फेटाळण्याच्या स्थितीत असतानाच हा अर्ज मागे घेण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. करडे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. देशपांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Think Tank' Gazaad