शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

गॅसकटरने एटीएम फोडायला आले आग लागली अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:43 AM

सीसीटीव्हीत झाले कैद

नागपूर : जरीपटक्यात आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; परंतु आग लागल्यामुळे आरोपी तेथून पळून गेले. ही घटना गुरुवारी पहाटे जरीपटकाच्या मेकोसाबाग कब्रस्तान मार्गावर घडली आहे.

जरीपटक्यात मेकोसाबाग कब्रस्तान रोडवर कॅनरा बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता दुचाकीस्वार तीन युवक तेथे आले. त्यांच्या जवळ गॅस कटर, सिलिंडर आणि एटीएम कापण्यासाठी लागणारी विविध उपकरणे होती. त्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीवर कपडा टाकला. त्यानंतर गॅस कटर आणि इतर उपकरणांच्या साह्याने मशीन कापत होते. खूप खटाटोप केल्यावर आरोपी एटीएमच्या लॉकरपर्यंत पोहोचले. दरम्यान, एटीएममध्ये आग लागली. आग विझविणे शक्य नसल्यामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने आरोपी तेथून फरार झाले.

सकाळी ९ वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात आरोपी ११ वाजता परिसरात फिरत असल्याचे दिसले. त्यांनी बराच वेळ एटीएम आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर पहाटे ३ वाजता चोरी करण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आले. यातील एक आरोपी सरदार आहे. दुचाकीचा नंबर न मिळाल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. जरीपटका पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमtheftचोरीnagpurनागपूर