चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले

By योगेश पांडे | Updated: October 17, 2023 18:24 IST2023-10-17T18:24:18+5:302023-10-17T18:24:31+5:30

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद

Thieves broke into a shop and stole mobile phones worth two and a half lakhs | चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले

चोरट्यांनी दुकान फोडले अन् सव्वा दोन लाखांचे मोबाईल पळवले

नागपूर : चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मोबाईलचे एक दुकान फोडले व जवळपास सव्वा दोन लाख किंमतीचे मोबाईल लंपास केले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नरेश प्राणनाथ घई (५२, पार्क व्हु अपार्टमेंट, कस्तुरचंद पार्क) असे दुकानदाराचे नाव असून त्यांचे टेलिफोन एक्स्चेंज चौक येथे काव्या मोबाईल शॉपी हे दुकान आहे. शनिवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले व सोमवारी दुकान उघडले. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शटर्सचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील विविध कंपन्यांचे २१ मोबाईल व तीन स्मार्ट वॉच असा एकूण २.३५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. घई यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Thieves broke into a shop and stole mobile phones worth two and a half lakhs