शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

मोबाईल परत करतो पण... चोराच्या 'या' नव्या डिमांडमुळे पोलीसही चक्रावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 11:32 IST

त्याला गाढ झोप लागल्याचे पाहून अज्ञात आरोपीने त्याचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावरील घटना

नागपूर : एनडीएची परीक्षा देण्यासाठी आलेल्या आणि रेल्वेस्थानकावर झोपलेल्या एका उमेदवाराचा मोबाइल अज्ञात आरोपीने पळविला. मोबाइलवर कॉल केला असता चोरट्याने फोन उचलला आणि मोबाइल परत देतो; पण दोन हजार रुपये फोन पे कर आणि फोन पेचा पासवर्ड सांग, अशी अट घातल्याने त्या उमेदवारासह पोलीसही चक्रावले.

शरद वानखेडे हा १७ वर्षांचा युवक वाशिम येथून एनडीएची परीक्षा देण्यासाठी ९ एप्रिलला नागपुरात आला. रविवारी १० एप्रिलला परीक्षा असल्यामुळे आणि नागपुरात राहण्याची सोय नसल्यामुळे तो आपल्या मित्रांसह रेल्वेस्थानकावर झोपी गेला. त्याला गाढ झोप लागल्याचे पाहून अज्ञात आरोपीने त्याचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल पळविला.

रविवारी त्या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून मोबाइल चोरीची फिर्याद नोंदविली. तेवढ्यात त्याने आपल्या चोरी गेलेल्या मोबाइलवर कॉल केला असता चोरट्याने कॉल उचलला. त्याने तुला मोबाइल पाहिजे असल्यास मला दोन हजार रुपये तुझ्याच मोबाइलवर फोन पे कर आणि फोन पेचा पासवर्ड सांग, अशी बतावणी केली. चोरट्याच्या या डिमांडमुळे लोहमार्ग ठाण्यातील पोलीसही चक्रावले. त्यानंतर काही वेळाने चोरट्याने मोबाइल स्विच ऑफ करून टाकला. अखेर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरnagpurनागपूरPoliceपोलिस