हात मारायचा आणि जे स्थानक आले त्यावर उतरून पाळायचे.. आरपीएफने बांधल्या हिस्ट्रीशिटरच्या मुसक्या
By नरेश डोंगरे | Updated: December 20, 2025 20:04 IST2025-12-20T20:03:30+5:302025-12-20T20:04:20+5:30
Nagpur : विविध रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या नागपूर विभागाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरपीएफ टास्क टीमला प्रवाशांची सुरक्षा, संरक्षण तसेच प्रवाशांच्या सामानाच्या चोरीस आळा घालण्यासाठी कडक निर्देश दिले आहेत.

They would wave their hands and get off at the station they came to.. The RPF arrest history sheeters
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्दीत शिरून प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) टास्ट टिमने जेरबंद केले. रवी मनोज निषाद (वय २०) आणि विष्णू बयास लोधी (वय २८) अशी या भामट्यांची नावे आहेत. इतवारी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
विविध रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या नागपूर विभागाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरपीएफ टास्क टीमला प्रवाशांची सुरक्षा, संरक्षण तसेच प्रवाशांच्या सामानाच्या चोरीस आळा घालण्यासाठी कडक निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, टास्क टीमचे सदस्य गाडी क्रमांक ५८८१५ इतवारी–तिरोडी पॅसेंजरमध्ये सक्रिय होते.
वेगवेगळ्या स्थानकावर गाडी थांबताना प्रवासी गडबड करतात. त्यामुळे दाराजवळ गर्दी होते. नेमकी संधी साधून खिसेकापू डाव साधतात. ही पद्धत लक्षात घेत टास्क टिमचे सदस्य गाडीचे इतवारी स्थानकावर आगमन होत असताना गर्दीवर नजर ठेवून होते. त्यांना रवी निषाद आणि विष्णू लोधी हे दोघे प्रवाशांच्या खिशाची चाचपणी करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांना रंगेहात पकडले. इतवारी स्थानकावर उतरवून त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांनी आपली नावे आणि पत्ता सांगितला. त्यानुसार, हे दोघेही रामकुंड, पोलीस ठाणे आजाद चौक, जिल्हा रायपूर (छत्तीसगड) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, निर्ढावलेल्या या गुन्हेगारांकडे रेल्वेचे तिकिट देखिल नव्हते. हात मारायचा आणि जे स्थानक आले त्यावर उतरून पळून जायचे, अशी त्यांची पद्धत होती. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना इतवारी रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. टास्क टीमचे फाैजदार के. के. निकोडे, आरक्षक राहुल सिंह, एस. के. साहू, आरक्षक विकास पटले, उपनिरीक्षक विवेक मेश्राम यांनी ही कामगिरी बजावली.
दोघांवरही अनेक गुन्हे
रेल्वे पोलिसांनी या दोघांची क्राईम हिस्ट्री काढली असता ते सराईत (हिस्ट्रिशिटर) गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. यादोघांवरही छत्तीसगडमधील रायपूर शहरात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.
प्रवाशांना आवाहन
प्रवाशांनी प्रवास करताना सतर्क राहावे, आपल्या सामानाची काळजी घेतानाच आजुबाजुला कुणी व्यक्ती अथवा महिला संशयास्पद वर्तन करीत असतील तर तातडीने आरपीएफ किंवा रेल मदत अॅपवर माहिती द्यावी, असे आवाहन या कारवाईनंतर सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे.