पुतणीच्या लग्नासाठी गेले, चोरट्याने ४.३० लाखांचा मुद्देमाल पळविला

By दयानंद पाईकराव | Updated: November 17, 2023 13:34 IST2023-11-17T13:33:58+5:302023-11-17T13:34:37+5:30

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

they went for nephew's wedding, the thief ran away with valuables worth 4.30 lakhs | पुतणीच्या लग्नासाठी गेले, चोरट्याने ४.३० लाखांचा मुद्देमाल पळविला

पुतणीच्या लग्नासाठी गेले, चोरट्याने ४.३० लाखांचा मुद्देमाल पळविला

नागपूर : पुतणीच्या लग्नाला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील दागीने आणि रोख असा एकुण ४.३० लाखांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी १५ नोव्हेंबरला रात्री नऊ ते गुरुवारी १६ नोव्हेंबरच्या रात्री १.३० दरम्यान घडली.

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुभाननगर मंगलदिप कॉलनी येथील रहिवासी झाकीर कामिल हुसैन खान (वय ५७) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह पुतणीच्या लग्नासाठी कामठी रोडवरील अमन सेलिब्रेशन येथे गेले होते. अज्ञात आरोपीने ते घरी नसल्याची संधी साधून त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने आलमारीतील सोन्याचे दागीने, ८ हातघडी व रोख २.५० लाख असा एकुण ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. झाकीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: they went for nephew's wedding, the thief ran away with valuables worth 4.30 lakhs