खाद्यपदार्थाच्या पाकिटावर दाखवतात एक अन् देतात दुसरेच, ग्राहकांची दिशाभूल केल्यास होईल १० लाखांचा दंड

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 27, 2026 16:04 IST2026-03-27T16:03:59+5:302026-03-27T16:04:55+5:30

Nagpur : खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर आकर्षक शब्द आणि चित्रे छापून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलले आहेत.

They show one thing on the food package and serve another, misleading the customers will result in a fine of Rs 10 lakh | खाद्यपदार्थाच्या पाकिटावर दाखवतात एक अन् देतात दुसरेच, ग्राहकांची दिशाभूल केल्यास होईल १० लाखांचा दंड

They show one thing on the food package and serve another, misleading the customers will result in a fine of Rs 10 lakh

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर आकर्षक शब्द आणि चित्रे छापून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलले आहेत. पाकिटावर दाखवले जाणारे घटक आणि प्रत्यक्षात पाकिटात असणारे पदार्थ यात तफावत आढळल्यास, संबंधित कंपन्यांवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी कंपन्यांचा खेळ खाद्यपदार्थाच्या नावाखाली कंपन्यांकडून केला जाणारा हा प्रकार म्हणजे निव्वळ नफेखोरीसाठी ग्राहकांच्या आरोग्याशी मांडलेला खेळ आहे. याला 'फूड मार्केटिंग फ्रॉड' असेही म्हणता येईल. 'हेल्दी'च्या नावाखाली साखरेचा भडिमार, घातक प्रिझव्र्हेटिव्हज आणि रंग, स्वस्त तेलाचा वापर, दिशाभूल करणारे लेबलिंग आदी उपयोगात आणतात.

'मिसब्रँडेड फूड' म्हणजे काय ?

ज्या खाद्यपदार्थाची माहिती ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने किंवा दिशाभूल करून दिली जाते. जेव्हा उत्पादक पाकिटावर एक गोष्ट लिहितो आणि प्रत्यक्षात त्यात दुसरेच काहीतरी असते, तेव्हा त्याला 'मिसब्रेडेड फूड' मानले जाते. जर एखादे उत्पादन 'मिसब्रेडेड' आढळले, तर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत उत्पादकावर ३ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

खाद्यपदार्थांत ग्राहकांची केली जाते दिशाभूल

खाद्यपदार्थांच्या मार्केटिंगमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा 'स्मार्ट' पण दिशाभूल करणाऱ्या पद्धती वापरल्या जातात. उत्पादनाच्या पाकिटावर जे दिसते आणि प्रत्यक्षात जे असते, यात मोठी तफावत असते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

कंपन्यांना १० लाखांचा दंड ठोठावला जाणार

उत्पादनांच्या पाकिटावर दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांविरुद्ध राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक पाऊल उचलले असून, १० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.

पाकिटावरील उल्लेखित घटक पदार्थात नावापुरताच

खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर मोठे अक्षरे वापरून विशिष्ट घटकाचा डांगोरा पिटला जातो, पण प्रत्यक्षात ते घटक अत्यंत नगण्य प्रमाणात असतात. या फसवणुकीला तांत्रिक भाषेत 'व्हिजुअल क्लेम' किंवा 'मार्केटिंग गिमिक' म्हटले जाते. अनेक 'बदाम शेक' किंवा 'केशर दूध'च्या पाकिटांवर मोठ्या अक्षरात या महागड्या घटकांचे नाव असते. मात्र, मागील बाजूला बारीक अक्षरात पाहिले तर त्यांचे प्रमाण केवळ ०.१ ते १ टक्के इतकेच असते. उरलेला भाग हा साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि रंगांनी भरलेला असतो.

मागील बाजूस पोषणमूल्ये तपासूनच खरेदी करा

खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील पुढच्या भागावर असलेली आकर्षक चित्रे अनेकदा दिशाभूल करणारी असतात. त्यामुळे खरेदी करताना पाकिटाची 'मागील बाजू तपासणे अत्यंत आवश्यक आहे तिथे स्वरी आणि तांत्रिक माहिती दडलेली असते.

"ग्राहकांनी जागरूक राहून उत्पादनाची खरेदी करावी. एखाद्या उत्पादनाबाबत संशय असेल, तर तात्काळ आमच्या पोर्टलवर किंवा टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी."
- कृष्णा जयपूरकर, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

Web Title : भ्रामक खाद्य पैकेजिंग पर ₹10 लाख का जुर्माना, सरकार की चेतावनी।

Web Summary : भ्रामक खाद्य पैकेजिंग से उपभोक्ताओं को गुमराह करने वाली कंपनियों पर अब ₹10 लाख का जुर्माना लगेगा। खाद्य एवं औषधि प्रशासन प्रदर्शित सामग्री और वास्तविक सामग्री के बीच विसंगतियों पर कार्रवाई कर रहा है, अस्वास्थ्यकर योजकों और भ्रामक लेबल जैसे स्वास्थ्य जोखिमों और कपटपूर्ण विपणन रणनीति को संबोधित कर रहा है। उपभोक्ताओं से पोषण संबंधी जानकारी जांचने का आग्रह किया गया है।

Web Title : Misleading food packaging will attract ₹10 lakh fine, warns government.

Web Summary : Companies misleading consumers with deceptive food packaging now face ₹10 lakh fines. The Food and Drug Administration is cracking down on discrepancies between displayed ingredients and actual contents, addressing health risks and fraudulent marketing tactics like unhealthy additives and misleading labels. Consumers are urged to check nutritional information.