शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

नागपूर जिल्ह्यातील १६ हजारावर अतिक्रमण होणार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 9:59 PM

जिल्ह्यातील गावठाणातील व इतर शासकीय जमिनीवर करण्यात आलेले ग्रामीण भागातील १६ हजारावर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणार आहे. त्यापैकी शासकीय जमिनीवर असलेल्या १२ हजारांवर अतिक्रमित जागांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वामित्व योजनेंतर्गत मिळणार घरांचे प्रापर्टी कार्ड : ५७ गावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील गावठाणातील व इतर शासकीय जमिनीवर करण्यात आलेले ग्रामीण भागातील १६ हजारावर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येणार आहे. त्यापैकी शासकीय जमिनीवर असलेल्या १२ हजारांवर अतिक्रमित जागांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर स्वामित्व योजनेंतर्गत ८ तालुक्यातील ५७ गावांतील ग्रामस्थांना त्यांच्या घराचे प्रापर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ७६८ ग्रा.पं.अंतर्गत बहुतांशी गावात सरकारी जागांवर अतिक्रमण असून, याची कारणेही स्थानपरत्वे वेगवेगळी आहेत. अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना शासनाने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील १६ हजारांवर घरांना मालकी हक्क मिळणार आहे. शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या आवास योजनेचा लाभ अतिक्रमणधारकांना घेता येत नव्हता. स्वमालकीची जागा नसल्याने ते लाभापासून वंचित होते. गायरान जमिनी, सार्वजनिक वापरातील जमिनी व वनक्षेत्र तसेच ज्या ठिकाणी वास्तव्य शक्य नाही अशा जागा वगळून इतर शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पर्यंतचे निवासी अतिक्रमण नियमित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ग्रा.पं.अंतर्गत येणाºया जवळपास ३,३७१ अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. तर शासकीय जागांवरील तब्बल १२ हजारावरील असे एकूण १६ हजारांवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येणार आहेत. ५०० चौ. फूट ते २००० चौ. फुटाचे अतिक्रमण नियमित होणार आहे. गावठाणील ३,३७१ पैकी ४१९ प्रकरणांवर सीईओंनी निर्णय दिला आहे. म्हणजेच त्या नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यापैकी ३४२ कुटुंबीयांचे ५०० चौ. फुटाहून अधिकचे अतिक्रमण असल्याने त्यांना शासकीय दराप्रमाणे त्याचे शुल्क भरावे लागणार आहे. तर यापूर्वी २०० वर लोकांना प्रॉपर्टी कार्डचेही वाटपही करण्यात आले आहे. तर आता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या २ आॅक्टोबरला स्वामित्व योजनेंतर्गत आणखी ८ तालुक्यातील ५७ गावांमधील हजारो नागरिकांना या प्रापर्टी कार्डाचे वितरण करून त्यांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती होणार आहे.ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून झाली मोजणीमहाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक गावातील गावठाणांतील जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरुवातीला मोजणी करण्यात आली. नंतर आणखी गावांचा यात समावेश करून त्यांचीही मोजणी करण्यात आली. तालुकानिहाय गाव -हिंगणा ६कळमेश्वर ६उमरेड १९भिवापूर ३कामठी ४नागपूर (ग्रा.) १०पारशिवनी २सावनेर २

टॅग्स :nagpurनागपूर