शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी तपासणी केंद्रांवर तीन दिवस ‘आरटीपीसीआर’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात रविवारी रेकॉर्ड २६ हजारांहून अधिक चाचण्या झाल्या. परंतु पुढील तीन दिवस चाचण्या रामभरोसेच राहणार आहेत. १२ आणि १४ एप्रिल रोजी सरकारी केंद्रांवर ‘आरटीपीसीआर’ चाचणी होणार नाही. तर १३ एप्रिल लोजी गुढीपाडव्यामुळे चाचणी केंद्र बंद राहतील. मनपाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. अचानकपणे चाचण्यांना ‘ब्रेक’ लावण्याचे नेमके कारण काय आणि संसर्ग बेलगाम झाल्यानंतर बाधितांमध्ये आणखी वाढ झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे अहवाल मिळायला विलंब होत आहे. या ‘बॅकलॉग’ला पूर्ण करणे व इतर काही तांत्रिक कारणांमुळे सरकारी चाचणी केंद्रांवर सोमवार व बुधवारी केवळ ‘रॅपिड ॲन्टिजेन’ चाचणीच होईल. प्रशासकीय पातळीवर अधिकारी व मंत्रीदेखील चाचण्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ॲन्टिजेनच्या अहवालाला अंतिम मानले जाऊ शकत नाही.

लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करणार : आयुक्त

‘कोरोना’ चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे मेडिकल, मेयो, एम्स, नागपूर विद्यापीठातील प्रयोगशाळांवर ओझे वाढले आहे. यामुळेच चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. या प्रयोगशाळांचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी सोमवारी व बुधवारी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रांवर केवळ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या होतील. केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले.