शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
7
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
8
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
9
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
10
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
12
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
13
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
14
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
15
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
16
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
17
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
18
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
19
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
20
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्यपूर्ण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

उमरेड : ग्रामीण भागात आजही अनेक शिक्षक उत्तम कार्य करीत आहेत. असंख्य शिक्षकांना कलागुणसंपन्नेची किनारही लाभली आहे. केवळ पुढाकार ...

उमरेड : ग्रामीण भागात आजही अनेक शिक्षक उत्तम कार्य करीत आहेत. असंख्य शिक्षकांना कलागुणसंपन्नेची किनारही लाभली आहे. केवळ पुढाकार घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती अधिक रूची निर्माण करावयाची असेल तर आता नावीन्यपूर्ण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिला. ते उमरेड उपविभागाच्या ‘बेस्ट प्रॅक्ट्रीस’ कार्यशाळेप्रसंगी बोलत होते. स्थानिक जीवन विकास विद्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेत उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विषयतज्ज्ञांचा सहभाग होता. योगेश कुंभेजकर यांनी पुढाकार घेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला चालना देण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूरच्या प्राचार्या हर्षलता बुराडे, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सावनकुमार, जिल्हा शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनपुरे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील, शारदा किनारकर, प्रकाश लेदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यशाळेत तीनही तालुक्यातील एकूण सहा शिक्षकांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शाळेत राबविलेले उपक्रम सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक हर्षलता बुराडे यांनी केले. संचालन एकनाथ पवार यांनी केले. आभार मनोज पाटील यांनी मानले. कार्यशाळेसाठी समूह साधन केंद्राने सहकार्य केले.