शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जागा मनपाच्या, पण सातबाऱ्यावर नोंद नाही

By admin | Updated: April 6, 2016 03:12 IST

नवीन बस आॅपरेटरला बस पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी वाडी, खापरी व पारडी येथील जकात नाक्यांच्या जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

प्रशासन उदासीन : बस डेपो व पार्किंगच्या कामात अडथळा नागपूर : नवीन बस आॅपरेटरला बस पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी वाडी, खापरी व पारडी येथील जकात नाक्यांच्या जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या जागा महापालिकेच्या मालकीच्या असूनही सातबारावर नावांची नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार परिवहन समितीच्या बैठकीत मंगळवारी निदर्शनास आला.शहर बससेवा सार्वजनिक वाहतुकींतर्गत आवश्यक सेवेत समाविष्ट आहे. परंतु बसेस पार्किंग, आगार व कार्यशाळेसाठी जागा उपलब्ध नसल्याने महापालिकेला अनेक अडचणींना सामोेरे जावे लागत आहे. लवकरच शहर बससेवेत नवीन बसेसची भर पडणार असल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी समितीची बैठक घेतली. जकात नाके बंद केल्याने या जागांचा वापर बस पार्किंग व आगारासाठी करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु या जागांच्या सातबारावर महापालिकेचे नाव नसल्याने कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. बस पार्किंग व आगारासाठी जागा उपलब्ध करण्याबाबतच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला गती येणार आहे. परंतु या जागांचा सातबारा महापालिकेकडे नसल्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहर विकास आराखड्यात शहर बससेवेसाठी आरक्षित असलेले भूखंड अधिग्रहित करून पार्किंगची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. गरज भासल्यास जागा मालकांना अतिरिक्त टीडीआर देऊ न जागा अधिग्रहित करण्याच्या सूचना बोरकर यांनी केल्या. बैठकीला स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, अपर आयुक्त नयना गुुंडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, नगर रचना विभागाच्या सहसंचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, महेश गुप्ता, झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, वाहतूक अभियंता कांती सोनकुसरे, आर.व्ही. मुळे, अरुण पिपरुडे, सुकीर सोनटक्के, विजय चौरसिया, संजय मोहले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तीन ठिकाणी जागा उपलब्ध अमरावती मार्गावरील वाडी नाका येथे १.५ हेक्टर, खापरी नाका येथे ०.९३ हेक्टर तर भंडारा रोडवर ३.८० हेक्टर जागा उपलब्ध आहे. या जागांच्या सातबारावर महापालिकेच्या नावाची नोंद करण्याचे निर्देश बोरकर यांनी दिले. बस पार्किंग व आगारासाठी जागा उपलब्ध करण्याबाबतच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला गती येणार आहे. परंतु या जागांचा सातबारा नसल्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.