शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत विदेशी कुत्र्यांची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीच्या नागपूर शहरात सुमारे ५० वर डॉग ब्रिडर्स आहेत. मात्र, नोंदणी एकाचीही ...

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीच्या नागपूर शहरात सुमारे ५० वर डॉग ब्रिडर्स आहेत. मात्र, नोंदणी एकाचीही नाही. देशी-विदेशी प्रजातीच्या महागड्या कुत्र्यांच्या विक्रीतून लाखोंची उलाढाल शहरात होत असली तरी कागदावर नोंदी कुठेच नाही. एवढेच काय तर घरी कुत्रे पाळणाऱ्या नागरिकांनीही नोंदी केलेल्या नाही.

शहरवासीयांचे श्वानप्रेम चांगलेच वाढले असले, तरी वर्षाला होणारी नोंदणी जेमतेम १०० च्या वर आहे. पाच हजारांपासून ते एक लाखापर्यंतचे देशी -विदेशी जातींचे श्वान पाळणारे व त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करणारे नागरिक शहरात आहेत. मात्र, कुत्र्यांच्या रीतसर नोंदणीकडे दुर्लक्ष आहे. यामुळे शहरात पाळीव कुत्री किती, याचा आकडाच महानगर पालिकेकडे नाही.

महानगर पालिकाही नोंदणीसाठी पुढाकार किंवा आवाहनही करताना दिसत नाही. एखाद्याचे महागडे कुत्रे हरविले किंवा चोरीस गेले तेव्हाच अनेकांना या नोंदणी प्रक्रियेची आठवण येते, ही वस्तुस्थिती आहे. नोंदणीची संख्या कमी असण्याचे कारण विचारले असता, पाळीव श्वानांची नोंद करणे आता बंधनकारक नसल्याचे मनपाच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

शहरामध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक डॉग ब्रिडर्स आहेत. उच्च प्रतीच्या देशी-विदेशी कुत्र्यांच्या पिलांची पैदास करून विक्रीचा व्यवसाय ही मंडळी करतात. मात्र, एकाही डॉग ब्रिडर्सची नोंद पशुवैद्यकीय विभाग अथवा महानगर पालिकेकडे नाही. सारेच बिनधास्त आणि कायदा खिशात ठेवून आहेत. ऑगस्ट महिन्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी ६० दिवसांचा अल्टिमेटम देऊन दंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता कुठे नोंदणीसाठी अर्ज यायला लागले आहेत.

...

तेरी भी चूप, मेरी भी चूप

- प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम-१९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम - २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन नियम - २०१७ नुसार या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. अधिनियम अस्तित्वात येऊन तीन वर्षे लोटूनही ऑगस्टपर्यंत शहरात एकाही व्यावसायिकाने नोंदणी केली नव्हती.

- प्राणी आणि पक्ष्यांच्या खाद्यान्न विक्रीचा फलक लावून त्या आड पक्षी आणि प्राण्यांची (विशेषत: देशी-विदेशी कुत्र्यांची) विक्री या दुकानांमध्ये होते. मात्र, दुकानदारांची नियमांकडे पाठ आहे. यंत्रणाही डोळे मिटून आहे.

...

नोंदणीकृत कुत्र्यांची संख्या

वर्ष : कुत्रे

२०१९-२० : १०२

२०२०-२१ : १३५

एप्रिल-ते ऑगस्ट २१ : ६३

...

पाळीव श्वानांचे परवाने

महिना : २०१९-२० : २०२०-२१ : २०२१ ते पुढे

एप्रिल : २३ :-:१३

मे : १६ :२०:१०

जून :११:६:१६

जुलै :९:२०:१२

ऑगस्ट : २:३६:१२

सप्टेबर : १३:८:-

ऑक्टोबर : ६:१६:-

नोव्हेंबर : १३:११:-

डिसेंबर : ६:६:-

जानेवारी : १:१:-

फेब्रुवारी : २:८:-

मार्च :-:३:-

एकूण : १०२:१३५:६३

...