शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सोले, कोहळेंच्या कुटुंबातून उमेदवार नाही

By admin | Updated: August 17, 2016 02:06 IST

महापालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झालेले भाजप नेते अनिल सोले, सुधाकर कोहळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये हे तीन नेते याच कार्यकाळात आमदार झाले.

आमदारांचे मनपातील वारस कोण ? : गजभियेंचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ कमलेश वानखेडे नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून दाखल झालेले भाजप नेते अनिल सोले, सुधाकर कोहळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये हे तीन नेते याच कार्यकाळात आमदार झाले. आमदार झाल्यानंतरही त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नाही. उलट महापालिकेच्या सभेत सक्रिय नगरसेवकाप्रमाणे भाग घेतला. आता आमदारकीमुळे यांना महापालिकेची निवडणूक लढविता येणार नाही. मात्र, ते आपली जागा कुणाला सोपवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आ. अनिल सोले व आ. सुधाकर कोहळे यांनी आपल्या कुटुंबातून कुणीही महापालिकेची निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले आहे तर आ. प्रकाश गजभिये यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. आ. अनिल सोले महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ५२ दीक्षाभूमी मधून विजयी झाले होते. त्या वेळी या प्रभागातून आणखी दोन-चार पदाधिकारी कार्यकर्तेही निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, सोले यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली. सोले लढले, जिंकले व पुढे महापौरही झाले.आ. सुधाकर कोहळे ६२, म्हाळगीनगर प्रभागात तर व आ. प्रकाश गजभिये हे ५४, व्हीएनआयटी या प्रभागातून महापालिकेची निवडणूक लढले होते. या दोन्ही नेत्यांच्या प्रभागातही इच्छुक कार्यकर्ते होते. मात्र, आपले नेते स्वत: रिंगणात उतरत असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी भक्कमपणे त्यांच्या पाठिशी राहणे पसंत केले. साधारणत: राजकारणात नेतेमंंडळी आपली गादी आपल्या घरच्या वारसाला सोपविताना दिसतात. कुणी पत्नीला रिंगणात उतरवितात तर कुणी मुलगा किंवा मुलीला. यापैकी कुणी सक्षम नसेल तर सख्ख्या नातेवाईकाचा प्राधान्याने विचार केला जातो. आमदार म्हणून काम केल्यानंतर खासदार झालेल्या काही दिग्गज नेते मंडळींनी आपल्या पत्नीला, मुलांना आमदारकीच्या रिंगणात उतरविल्याची उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. अशात आमदारांनी महापालिकेतील आपली जागा नातेवाईकाला दिली तर वावगे काय, असेही समर्थन नेत्यांकडून केले जाते. महापालिकेची प्रभाग रचना अद्याप जाहीर व्हायची आहे. सामाजिक आरक्षणाचे चित्रही स्पष्ट व्हायचे आहे. हे सर्व झाल्यानंतरच इच्छुक उमेदवारांचे चेहरे पुढे येतील. त्यावेळी आमदारांच्या जागी कुणाला संधी मिळते हे स्पष्ट होईल.