जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेंच्या घरी चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 13:01 IST2019-11-19T12:54:34+5:302019-11-19T13:01:35+5:30
जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या ज्योती आमगे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.

जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेंच्या घरी चोरी
नागपूर - जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या ज्योती आमगे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ज्योती नागपूरच्या रहिवासी आहेत. कामानिमित्त बाहेर गावी गेलेल्या असताना चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती आमगे यांच्या बगडगंज येथील घरी चोरी झाली आहे. चोरीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. कपाटातील तिजोरी फोडून अंगठी आणि पैसे चोरीला गेल्याची माहिती ज्योती यांनी पोलिसांना दिली आहे. तसेच या प्रकारामुळे धक्का बसल्याचं देखील ज्योती यांनी सांगितलं आहे.