शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

...अन् माया वाघिणीच्या समाेर जिप्सीतून खाली पडला पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:50 IST

प्रसंगावधान साधून सहपर्यटकांनी त्याला जिप्सीत परत आणले खरे; पण या घटनेमुळे सफारीदरम्यानच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजय रानडे -

नागपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) कोअर झोनमध्ये रविवारी पहाटेच्या सफारीदरम्यान अंगावर काटा येणारा प्रसंग घडला. येथे प्रसिद्ध असलेली माया वाघीण आणि तिचे शावक अगदी काही फूट अंतरावर असताना एक पर्यटक त्यांच्या जिप्सीतून खाली पडला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पडलेल्या व्यक्तीसाेबत इतरही पर्यटक हादरून गेले हाेते. प्रसंगावधान साधून सहपर्यटकांनी त्याला जिप्सीत परत आणले खरे; पण या घटनेमुळे सफारीदरम्यानच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक राजकारणी किशोर कान्हेरे (५८) आणि इतर काही जण रविवारी सकाळी ताडाेबात सफारीसाठी गेले होते. कोलारा गेटपासून सफारीला सुरुवात झाली. कान्हेरे यांची जिप्सी पांढरपौनी परिसरात पोहोचली. तेव्हा माया वाघिणी तिच्या पिल्लासह रस्त्याने चालत होती. घटनास्थळी आणखी दोन जिप्सी आधीच हाेत्या. चांगल्या पद्धतीने व्याघ्र दर्शन व्हावे म्हणून जिप्सी मागेपुढे केली असता कान्हेरे डाव्या बाजूला असलेल्या वाहनातून खाली पडले, तसा सर्वांचा थरकाप उडाला. 

याेग्य उपाययाेजना करण्यात येतील ताडाेबाचे क्षेत्र संचालक वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी या घटनेबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही दिली. 

nकान्हेरे यांनी सांगितले, आमच्या जिप्सी चालकाने वाघीण दिसल्यावर अचानक ब्रेक लावला. या धक्क्याने माझा तोल गेला आणि खाली पडलो. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच सुरक्षितपणे गाडीत परतल्याचे त्यांनी सांगितले.

चालकांना प्रशिक्षण आवश्यक  पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खुर्सापार गेटवर कार्यरत जिप्सी चालक व निसर्गप्रेमी दिनेश सिरसाम हे १२ वर्षांपासून सफारी जिप्सी चालवत आहे. त्यांनी महाराष्ट्र वन विभागातर्फे आयोजित चालक प्रशिक्षण सत्रात भाग घेतला आहे. सिल्लारी, पेंच याने बऱ्याच नवीन ड्रायव्हर्सना सफारीवर असताना उद्यानात काय चूक होऊ शकते आणि अशा परिस्थितीचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यात आणि समजून घेण्यात मदत झाली, असे प्रशिक्षण सर्व जंगलांमध्ये आयोजित करणे आवश्यक आहे.

सफारीला जाताना लक्षात ठेवा -- गाडी चालत असताना उभे राहू नये.- प्रतिबंधित क्षेत्रात गाडीखाली उतरू नये.- जंगलात कचरा टाकू नये आणि गाेंगाट करू नये.- वन्यजीवांशी छेडछाड करू नका, त्यांना अडवू नका.

 

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पnagpurनागपूर