शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

संघाने नथुरामचा विचार बाजूला ठेऊन, मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकारावे : सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:53 IST

मूठभर लोकांच्या हाती सत्ता ठेवण्याचा डाव : नथुरामचा विचार बाजूला ठेवावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असून, त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर हल्लाबोल केला. संघाने नथुरामचा विचार बाजूला ठेवावा, मनुस्मृतीची होळी करून संघ बरखास्त करून संविधानाचा स्वीकार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मेडिकल चौक येथे काँग्रेस कमिटीच्या नागपूर पदवीधर मतदारसंघ दक्षिण नागपूर पदवीधर नोंदणी कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. त्यावेळी सपकाळ पत्रकार परिषदेत बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रसन्ना तिडके, गुड्डू तिवारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसची विचारधारा संविधानावर, करुणा व समतेवर आधारित आहे. मात्र, संघाची विचारसरणी मनुस्मृतीतील भेदभाव, विषारी आणि विखारी प्रचारावर आधारलेली असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

भगवान बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या तत्त्वज्ञानाला नाकारणारेच मनुवादी होते. वारकरी संप्रदायाने 'आपण सर्व एक आहोत' हे तत्त्वज्ञान दिले. काँग्रेस त्याच तत्त्वज्ञानावर आधारित संविधानाच्या मार्गाने चालते, असे सपकाळ म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता, उलट संघाने इंग्रजांची व्यवस्था मान्य केली होती, असा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत व कर्जमाफी द्या

  • अतिवृष्टी व पुरामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपकाळ आक्रमक झाले. काँग्रेस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. पण, सरकारने अद्याप मदत केली नाही.
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ५ २ लाखांची मदत, कर्जमाफी जाहीर करून रब्बी पिकासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
English
हिंदी सारांश
Web Title : Sapkal: RSS should abandon Nathuram's ideology and accept the Constitution.

Web Summary : Congress leader Harshvardhan Sapkal urged RSS to discard Nathuram's ideology, burn Manusmriti, and embrace the Constitution. He criticized RSS's divisive ideology, contrasting it with Congress's principles of equality. Sapkal also demanded aid for flood-affected farmers.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळnagpurनागपूरVidarbhaविदर्भRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत